शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

१० रेतीघाटांमधून सात कोटींचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 05:00 IST

राज्याच्या पर्यावरण समितीच्या मान्यतेअभावी जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव थांबला होता. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता आल्याने जाहीर झालेली लिलाव प्रक्रिया थांबविण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा २५ रेतीघाटांसाठी लिलाव करण्यात आला. परंतू त्यात १० घाटांसाठीच नियमानुसार निविदा आल्या. शासनाने निश्चित केलेल्या किमतीपेक्षा बरीच जास्त किंमत या घाटांना मिळाली आहे.

ठळक मुद्देबांधकामे मार्गी लागणार, १५ घाटांच्या लिलावसाठी पुन्हा हाेणार निविदा प्रक्रिया

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित रेतीघाटांच्या लिलावची प्रक्रिया अखेर मार्गी लागली आहे. पहिल्या लिलावात २५ पैकी १० घाटांचा लिलाव होऊ शकला. यात मोठ्या घाटांचा समावेश नसला तरी ज्या घाटांचा लिलाव झाला त्यातून रखडलेली बांधकामे पुन्हा सुरू होतील. राज्याच्या पर्यावरण समितीच्या मान्यतेअभावी जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव थांबला होता. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता आल्याने जाहीर झालेली लिलाव प्रक्रिया थांबविण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा २५ रेतीघाटांसाठी लिलाव करण्यात आला. परंतू त्यात १० घाटांसाठीच नियमानुसार निविदा आल्या. शासनाने निश्चित केलेल्या किमतीपेक्षा बरीच जास्त किंमत या घाटांना मिळाली आहे. त्यातून ७ कोटीपेक्षा जास्त महसूल शासनाला मिळत आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच तीन वर्षासाठी, म्हणजे २०२२-२३ पर्यंत संबंधितांचा त्यावर अधिकार राहणार आहे. मात्र त्यांना दरवर्षी त्याचा मोबदला शासनाकडे भरावा लागेल.निविदा न आलेल्या १५ रेतीघाटांमध्ये अनेक मोठ्या घाटांचा समावेश आहे. त्यात प्रामुख्याने सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवर असलेल्या मुकडीगटा रै., मद्दीकुंटा, रेगुंठामाल, अंकिसामाल, चिंतरवेला आणि आरडा आदी घाटांचा समावेश आहे. या घाटांची किंमत प्रत्येकी २.४७ कोटी ते ३.७१ कोटी आहे. यावर्षी तेलंगणा राज्यातील अनेक रेतीघाट आधीच सुरू करण्यात आल्यामुळे आणि या घाटांना अपेक्षित प्रतिसाद मिळणार की नाही याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. यासोबतच कुरखेडा तालुक्यातील सती नदी, चामोर्शी तालुक्यातील  पोहार आणि कठाणी नदीवरील काही घाटांचा लिलाव होऊ शकला नाही. त्यासाठी पुन्हा निविदा प्रक्रिया केली जात आहे.   

लिलाव झालेले घाट आणि त्यांची किंमतबोदलीमाल (८४ लाख), लांझेडा (७६ लाख), अडपल्ली-१ (४५.७५ लाख), अडपल्ली-२ (५९.५१ लाख), आंबेशिवणी-राममंदिरघाट (४६ लाख), दिभनाचक (६० लाख), रामपूरचक (७७ लाख), वनखी (१.६० कोटी), नान्हीघाट (५६ लाख), मेडाराममाल (३५ लाख)

सामान्य नागरिकांनाही मिळणार दिलासावर्षभरापासून रेतीचे लिलाव रखडले असल्याने दामदुप्पट दराने रेती खरेदी करावी लागत हाेती. त्यामुळे सामान्य नागरिकांसाठी घराचे बांधकाम किंवा इतर बांधकामासाठी रेतीचे हे दर अवाक्याबाहेर गेले हाेते. परंतु आता लिलाव प्रक्रिया झाल्याने अनेक घाटांमधून अधिकृतपणे रेती मिळणार आहे. त्यामुळे रेतीचे दर कमी हाेऊन रखडलेली बांधकामे मार्गी लागतील, या कल्पनेने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

 

टॅग्स :sandवाळू