६५ रुग्णांनी केला दारूमुक्तीचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:35 IST2021-03-16T04:35:50+5:302021-03-16T04:35:50+5:30
मुक्तिपथ अभियानद्वारे १२ मार्च रोजी आलापल्ली शहरातील मुक्तिपथ तालुका कार्यालयात २६ रुग्णांनी क्लिनिकला भेट देऊन उपचार घेतला. सिरोंचातील रामाराव ...

६५ रुग्णांनी केला दारूमुक्तीचा निर्धार
मुक्तिपथ अभियानद्वारे १२ मार्च रोजी आलापल्ली शहरातील मुक्तिपथ तालुका कार्यालयात २६ रुग्णांनी क्लिनिकला भेट देऊन उपचार घेतला. सिरोंचातील रामाराव दुधीवार यांच्या घरी असलेल्या तालुका कार्यालयात १०, देसाईगंज शहरातील कन्नमवार वाॅर्डातील तालुका कार्यालयात १० मार्च रोजी २३ रुग्णांनी उपचार घेतला. एटापल्ली तालुका क्लिनिकमधून ६ रुग्णांवर उपचार करण्यात आले. अशा एकूण ६५ रुग्णांनी पुढाकार घेत उपचार घेऊन दारूमुक्त होण्यासाठी पुढाकार घेतला.
क्लिनिकला भेट दिलेल्या रुग्णांना समुपदेशन करण्यात आले. दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषधोपचार घेणे आदींची माहिती रुग्णांना देण्यात आली. मुक्तिपथ तालुका कार्यालयांत ठरावीक दिवशी क्लिनिकचे आयोजन केल्या जाते. दारूचे व्यसन सोडण्याची इच्छा असणाऱ्या जास्तीत जास्त रुग्णांनी क्लिनिकला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.