६५ जोडपी झाली विवाहबध्द
By Admin | Updated: June 1, 2015 02:01 IST2015-06-01T02:01:41+5:302015-06-01T02:01:41+5:30
जिल्हा महिला व बाल कल्याण विकास कार्यालय गडचिरोली व जय शेषबाबा ग्राम विकास बहुउद्देशीय संस्था कुरूडच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी विसापूर

६५ जोडपी झाली विवाहबध्द
अवाढव्य खर्चाची बचत : विसापूर रै येथे सामूहिक विवाह मेळावा
तळोधी मो. : जिल्हा महिला व बाल कल्याण विकास कार्यालय गडचिरोली व जय शेषबाबा ग्राम विकास बहुउद्देशीय संस्था कुरूडच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी विसापूर रै येथील जि.प. शाळेच्या प्रांगणात सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात विविध जाती धर्माचे एकूण ६५ जोडपी विवाहबंधनात अडकली.
सामूहिक विवाह सोहळ्याचे उद्घाटन चामोर्शी पंचायत समितीच्या सभापती शशिकला चिळंगे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पं.स. सदस्य किरण कोवासे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विसापूरच्या सरपंच जयश्री दुधबळे, उपसरपंच उदयसिंग धिरबंशी, माजी जि.प. सदस्य शंकर मुरकुटे, जान्हू बोधलकर, जि.प. सदस्य स्वप्नील वरघंटे, माजी पं.स. उपसभापती बंडू चिळंगे, ग्रा.पं. सदस्य बबिता वासेकर, निर्मला सातपुते, सोमनाथ पिपरे, नीलकंठ बोधलकर, विसापूरच्या पोलीस पाटील नंदा पेदाम, सिताराम गावतुरे, सतीश गावडे, चुडाराम श्रीरंगे, तंमुस अध्यक्ष सोनपाल साबळे, उपाध्यक्ष रोहिदास भांडेकर, ग्रामसेवक गावित, मुख्याध्यापक तुमराम आदी उपस्थित होते. विवाहाची विधी आटोपल्यानंतर प्रत्येक जोडप्यांना १० हजार रूपयांचा धनादेश उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राकेश मुरकुटे, संचालन विनायक कुनघाडकर यांनी तर आभार वर्षा मुरकुटे यांनी मानले. (वार्ताहर)