६३९ प्रगणक करणार आर्थिक गणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST2019-11-27T06:00:00+5:302019-11-27T06:00:34+5:30

देशातील नागरिकांची आर्थिक परिस्थितीची प्रत्यक्ष माहिती उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आर्थिक गणना केली जाते. यावर्षीची जनगणना ही सातवी आर्थिक गणना आहे. आर्थिक गणनेचे काम सामाईक सेवा केंद्रांमार्फत केले जाणार आहे. दिलेल्या वेळेत काम पूर्ण व्हावे, यासाठी ६३९ प्रगणक नेमण्यात आले आहेत. मंगळवारी प्रभारी जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला.

639 The financial calculators will be done | ६३९ प्रगणक करणार आर्थिक गणना

६३९ प्रगणक करणार आर्थिक गणना

ठळक मुद्देसंविधान दिनी शुभारंभ : आढावा घेतला

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मंगळवारपासून आर्थिक गणना करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. यासाठी सांख्यिकी विभागाने ७६७ पर्यवेक्षक व ६३९ प्रगणकांची नेमणूक केली आहे.
देशातील नागरिकांची आर्थिक परिस्थितीची प्रत्यक्ष माहिती उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आर्थिक गणना केली जाते. यावर्षीची जनगणना ही सातवी आर्थिक गणना आहे. आर्थिक गणनेचे काम सामाईक सेवा केंद्रांमार्फत केले जाणार आहे. दिलेल्या वेळेत काम पूर्ण व्हावे, यासाठी ६३९ प्रगणक नेमण्यात आले आहेत. मंगळवारी प्रभारी जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा सांख्यिकी अधिकारी रमेश पेरगू, संशोधन सहायक तुषार लंगे, प्रशांत गटकोजवार, रमेश निखारे, नागपूर कार्यालयाचे पौणीकर, सीएसीचे जिल्हा व्यवस्थापक मनिष लांबट, शाहीद शेख, सौरभ धंदरे आदी उपस्थित होते. आर्थिक गणनेचे काम सुरळीत व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वेळोवेळी आढावा घेतला जाणार आहे.

पेपरलेस पद्धतीने होणार गणनेचे काम
आर्थिक गणना करण्यासाठी केंद्र शासनाने मोबाईल अप्लीकेशन तयार केले आहे. संबंधित प्रगणकाचा लॉगीन आयडी तयार केला जाणार आहे. या अ‍ॅपमध्ये प्रगणक माहिती भरणार आहे. संपूर्ण काम पेपरलेस पध्दतीने होणार आहे. देशाची आर्थिक स्थिती कळण्यासाठी सदर गणना अतिशय महत्त्वाची असल्याने नागरिकांनी प्रगणकांना खरी माहिती पुरवावी. तसेच या राष्टÑीय कार्यात कोणताही अडथळा आणू नये, असे आवाहन प्रभारी अधिकारी कुळमेथे यांनी केले आहे.

Web Title: 639 The financial calculators will be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.