६२ टक्के पाेलीस अजूनही लसीकरणापासून दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:36 IST2021-03-16T04:36:23+5:302021-03-16T04:36:23+5:30
बाॅक्स ७८१ पाेलिसांना दुसरा डाेस पहिली लस घेतल्यानंतर २८ दिवसांच्या कालावधीनंतर दुसरा बुस्टर डोस घ्यावा लागतो. त्यापैकी ७८१ जणांनी ...

६२ टक्के पाेलीस अजूनही लसीकरणापासून दूर
बाॅक्स
७८१ पाेलिसांना दुसरा डाेस
पहिली लस घेतल्यानंतर २८ दिवसांच्या कालावधीनंतर दुसरा बुस्टर डोस घ्यावा लागतो. त्यापैकी ७८१ जणांनी दुसऱ्यांदा लस घेतली आहे. मात्र, दुसरी लस घेण्याचे प्रमाणही कमी असल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
सुरक्षिततेच्या कारणामुळे अडचण
गडचिराेली जिल्ह्यातील बहुतांश पाेलीस नक्षलग्रस्त भागात कार्यरत आहेत. या पाेलिसांना वाहनांचा वापर करण्यास प्रतिबंध आहे. यापूर्वी काेराेनाचे लसीकरण केंद्र केवळ तालुकास्थळी हाेते. त्यामुळे नक्षलग्रस्त भागात कार्यरत असलेल्या पाेलीस जवानाला तालुकास्थळ गाठून लस घेणे शक्य हाेत नव्हते. सुरक्षिततेच्या कारणावरून वरिष्ठ अधिकारीसुद्धा संबंधित कर्मचाऱ्याला साेडत नव्हते. त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे.
केंद्रे वाढल्याने लसीकरणाची गती वाढणार
पूर्वी तालुकास्तरावर एकच केंद्र हाेते. आता मात्र प्राथमिक आराेग्य केंद्रावरून लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्राथमिक आराेग्य केंद्र पाेलीस मदत केंद्राच्या जवळच असल्याने प्राथमिक आराेग्य केंद्रात जाऊन पाेलीस लस घेतील, अशी अपेक्षा आहे.
एकूण पाेलीस १२,३३२
लसीकरण झालेले ४,६९४
दुसरा डाेस घेतलेले ७८१