कढोलीच्या गुढीपाडवा उत्सवाला ६१ वर्षांची परंपरा
By Admin | Updated: April 8, 2016 01:22 IST2016-04-08T01:22:25+5:302016-04-08T01:22:25+5:30
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे वर्षप्रतिपदा या दिवसापासून मराठी नूतन वर्षारंभ होते. गुढी उभारून हा सन सर्वत्र साजरा होत असला तरी ...

कढोलीच्या गुढीपाडवा उत्सवाला ६१ वर्षांची परंपरा
शोभायात्रा : दोन दिवस विविध कार्यक्रम
वैरागड : चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे वर्षप्रतिपदा या दिवसापासून मराठी नूतन वर्षारंभ होते. गुढी उभारून हा सन सर्वत्र साजरा होत असला तरी कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे गुढीपाडव्याचा मोठा उत्सव असतो. येथील उत्सवाला ६१ वर्षांची परंपरा आहे व ती आजही कायम आहे.
हनुमान मंदिरापासून गावाच्या मुख्य रस्त्याने हनुमान आणि खांद्यावर विराजमान असलेल्या प्रभू श्रीराम, लक्ष्मण यांच्या मूर्तीची शोभायात्रा काढून गावातील मुख्य चौकात एका उंच खांबावर गुढी आणि भगव्या पताका उभारून या ठिकाणी उत्सवाची समाप्ती केली जाते. दोन दिवस चालणाऱ्या उत्सवात पहिल्या दिवशी घटस्थापना, गुढीपाडव्याच्या दिवशी गोपालकाला, महाप्रसाद कार्यक्रम, रात्री शोभायात्रा आणि मनोरंजनासाठी विविध कार्यक्रम होतात. मागील ६१ वर्षांपासून कढोली येथे गुढीपाडवा उत्सव साजरा केला जात आहे. यासाठी येथे विशेष तयारीही करण्यात आली आहे.
यावर्षीचा उत्सव शांततेत पार पडावा याकरिता दिवाकर रंदये, ज्ञानेश्वर वाघ, किरण टेकाम, मधुकर वाडगुरे, श्रावण गरमळे, दिलीप गायकवाड, फाल्गुन चौके, शैलेश आकरे, शामराव ठाकरे, माणिकचंद भोयर, चिंतामण दडमल, भगवान नारनवरे, हिरालाल चौधरी, हरिदास मानकर, सुरेश गावतुरे, मुन्ना आकरे, देवराव वरवडे, बाबुराव बुल्ले यांच्यासह कढोली येथील ग्रामस्थ परिश्रम व सहकार्य करीत आहेत. (वार्ताहर)