६१ कोरोनामुक्त, तर ५१ नवीन कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:25 IST2021-06-11T04:25:26+5:302021-06-11T04:25:26+5:30

कोरोनावर मात केली तर दाेन काेराेनाबाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २९ हजार ८२९ एवढी झाली आहे. त्यापैकी ...

61 coronal free, 51 new corona free | ६१ कोरोनामुक्त, तर ५१ नवीन कोरोनाबाधित

६१ कोरोनामुक्त, तर ५१ नवीन कोरोनाबाधित

कोरोनावर मात केली तर दाेन काेराेनाबाधितांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २९ हजार ८२९ एवढी झाली आहे. त्यापैकी २८ हजार ६६८ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या ४३० कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण ७३१ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज दाेन नवीन मृत्यूंमध्ये ६५ वर्षीय पुरुष कुरंजा, ता. आरमोरी, ६९ वर्षीय पुरुष कन्नमवार वाॅर्ड गडचिरोली यांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.११ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण १.४४ टक्के तर मृत्युदर २.४५ टक्के झाला. नवीन ५१ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १८, अहेरी तालुक्यातील ६, भामरागड

तालुक्यातील ७, चामोर्शी तालुक्यातील १३, एटापल्ली तालुक्यातील ४, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये १, सिरोंचा

तालुक्यातील बाधितांमध्ये १ तर देसाईगंज तालुक्यातील बाधितांमध्ये ५ जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त

झालेल्या ६१ रुग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १८, अहेरी १, आरमोरी २, चामोर्शी १६, धानोरा २,

एटापल्ली २, मुलचेरा ७, सिरोंचा ६, देसाईगंज येथील ७ जणांचा समावेश आहे.

Web Title: 61 coronal free, 51 new corona free