६ लाख ८८ हजारांची दारू देसाईगंजमध्ये जप्त
By Admin | Updated: January 13, 2017 00:43 IST2017-01-13T00:43:28+5:302017-01-13T00:43:28+5:30
तालुक्यातील अरततोंडी येथे वाहनातून देसाईगंज पोलिसांनी ६ लाख ८८ हजार रूपयांची देशी दारू वाहनासह गुरूवारी जप्त केली आहे.

६ लाख ८८ हजारांची दारू देसाईगंजमध्ये जप्त
देसाईगंज : तालुक्यातील अरततोंडी येथे वाहनातून देसाईगंज पोलिसांनी ६ लाख ८८ हजार रूपयांची देशी दारू वाहनासह गुरूवारी जप्त केली आहे.
तालुक्यातील अरततोंडी येथे गावकऱ्यांनी एक काळसर ग्रे रंगाची एमएच ३३ ए ५२९७ नंबर असलेली गाडी अवैध देशी दारूची वाहतूक करीत असल्याने पकडली. या गाडीवर अब्दुल रॉफ अब्दुल रज्जाक शेख रा. कमलनगर देसाईगंज हा चालक होता. त्यालाही गावकऱ्यांनी पकडले. या वाहनातून ८८ हजार रूपयांची देशी दारू, एक लाख रूपये किमतीची २५ बॉक्समध्ये १०० निपा असलेली दारू जप्त करण्यात आली. सोबत ५ लाख रूपयांची मारोती गाडीही जप्त केली आहे. सदर कारवाई देसाईगंजचे पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात उपनिरिक्षक सोहेल पठाण यांनी केली. (वार्ताहर)