भामरागडात ५७.१९ टक्के मतदान

By Admin | Updated: February 22, 2017 02:01 IST2017-02-22T02:01:44+5:302017-02-22T02:01:44+5:30

भामरागड तालुक्यात दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती जागांसाठी मंगळवारी मतदान पार पडले.

57.99 percent voting in Bhamrangad | भामरागडात ५७.१९ टक्के मतदान

भामरागडात ५७.१९ टक्के मतदान

शांततेत मतदान : पहिल्यांदाच सर्व पोलिंग पार्ट्या एकाच दिवशी दाखल
भामरागड : भामरागड तालुक्यात दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती जागांसाठी मंगळवारी मतदान पार पडले. भामरागड तालुक्यात ५७.१९ टक्के मतदान झाले. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पोलिंग पार्ट्या आणण्यात आल्याने मतदानाच्या दिवशीच निर्धारित वेळेत सर्व पोलिंग पार्ट्या तहसील मुख्यालयात दाखल झाल्या.
भामरागड तालुक्यात आरेवाडा क्र. १ च्या मतदान केंद्रांवर एकूण ४७४ मतदारांनी मतदान केले असून याची टक्केवारी ६१.९६ आहे. आरेवाडा केंद्र क्रमांक २ वर २३१ मतदारांनी मतदान केले असून येथील टक्केवारी ६४.८८ आहे. किअर मतदान केंद्रावर ६७.८४ टक्के मतदान झाले. नारगुंडा ६६.६० टक्के, पोयरकोठी मतदान केंद्रावर ६९.७६ टक्के, हालेदंडी केंद्रावर ५५ टक्के, तुर्रेमर्का केंद्रावर ४७.८२ टक्के मतदान झाले. धोडराज केंद्र क्र. १ वर ५४.७४ टक्के, धोडराज केंद्र क्र. २ वर ५१.७० टक्के, नेलगुंडा केंद्र क्र. १ वर ४१.३१ टक्के मतदान झाले. गोपनार केंद्रावर ६२.९२ टक्के, लाहेरी केंद्रावर ७१.६०, मल्लमपोडूर केंद्र क्र. १ वर ७० टक्के तर मल्लेमपोडूर केंद्र क्र. २ वर ५६.६१ टक्के मतदान झाले. गोंगवाडा येथील केंद्र क्र. १ वर ४५.८४ टक्के मतदान झाले असून या केंद्रावर २०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गोंगवाडा केंद्र क्र. २ वर २६५ मतदारांनी मतदान केले असून याची टक्केवारी ५६.८३ आहे.
कोठी केंद्र क्र. १ वर एकूण ७२६ मतदारांपैकी ४५१ मतदारांनी मतदान केले असून येथील टक्केवारी ६२.१७ आहे. कोठी केंद्र क्र. २ वर २३० पैकी १३९ मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी ६०.४३ टक्के आहे. टेकला मतदान केंद्रावर ६१२ पैकी २६१ मतदारांनी मतदान केले. येथे ४२.६४ टक्के मतदान झाले.
बोटनफुंडी केंद्रावर ७८४ मतदारांपैकी ४५३ जणांनी मतदान केले असून याची टक्केवारी ५७.७८ आहे. बिसामुंडी केंद्रावर ५४६ पैकी २१३ मतदारांनी मतदान केले असून येथील टक्केवारी ३९ टक्के आहे. चिचोडा येथील केंद्रावर ५४.१८ टक्के मतदान झाले. २९१ मतदारांनी येथे मतदानाचा हक्क बजावला. इरकडुम्मे येथील केंद्रावर ७६४ पैकी ४५९ मतदारांनी मतदान केले असून येथील मतदानाची टक्केवारी ६०.०७ आहे. मन्नेराजाराम केंद्र क्र. १ वर एकूण ४८० मतदारांपैकी २८० जणांनी मतदान केले असून याची टक्केवारी ५८.२२ आहे.
मन्नेराजाराम केंद्र क्र. २ वर ५२.६६ टक्के, बामनपल्ली केंद्रावर ४४.७८ टक्के, येचली येथील केंद्रावर ६४.१० टक्के, पल्ली येथील केंद्रावर ५२.६० टक्के तर चिचोडा केंद्रावर ४९.३२ टक्के मतदान झाले. (तालुका प्रतिनिधी)

९ हजार ८३८ मतदारांनी बजावला हक्क
भामरागड तालुक्यात जिल्हा परिषद क्षेत्र व पंचायत समिती गणाच्या निवडणुकीसाठी ३१ मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. या सर्वच केंद्रांवर तगड्या पोलीस बंदोबस्तात उत्साहात मतदानाची प्रक्रिया पार पडली. यंदा प्रथमच भामरागड तालुक्यात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. भामरागड तालुक्यात एकूण १७ हजार २०१ मतदार होते. यापैकी ९ हजार ८३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ८ हजार ६४५ पुरूष मतदारांपैकी ५ हजार ५९१ जणांनी मतदान केले. पुरूष मतदानाची टक्केवारी ६४.६७ आहे. तर महिला मतदानाची टक्केवारी ४९.६३ आहे.

 

Web Title: 57.99 percent voting in Bhamrangad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.