जिल्ह्यातील ५६३ कर्मचाऱ्यांनी दिली मंत्रालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:13 IST2018-02-25T00:13:28+5:302018-02-25T00:13:28+5:30

जिल्ह्यातील ५६३ कर्मचाऱ्यांनी दिली मंत्रालयावर धडक
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : राज्य सरकारी जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी गुरूवारी मुंबई येथील मंत्रालयावर मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात गडचिरोली जिल्ह्यातील विविध विभागांचे ५६३ कर्मचारी सहभागी झाले होते.
अंशदायी पेंशन योजना रद्द करून जुनी पेंशन योजना लागू करा, सातवा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करा, वेतन आयोगाची तत्काळ अंमलबजावणी करा, केंद्राप्रमाणे महागाई भत्ता थकाबाकीसह विनविलंब द्या, रिक्त पदे भरा, पदांच्या कपातीचे धोरण रद्द करा, अनुकंपा तत्वावर पूर्वीप्रमाणेच नेमणूका करण्यात याव्या, महिला कर्मचाºयांच्या दोन वर्षांची बालसंगोपन रजा मंजूर करा, पाच दिवसांचा आठवडा लागू करा, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करा आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. मार्चानंतर आझाद मैदानावर सभा आयोजित करण्यात आली.
मोर्चाला आमदार कपील पाटील, विक्रम काळे, ना.गो.गानार संबोधित केले. मोर्चाचे नेतृत्व राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे निमंत्रक र.ग.कर्णिक, अध्यक्ष गजानन शेटे, मिलींद सरदे, अविनाश दौंड , विश्वास काटकर, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे उमेशचंद्र चिलबुले, अशोक थुल,शिक्षक समितिचे अध्यक्ष शिंदे, भाऊसाहेब पठान, ग.दी.कुलथे, ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष एकनाथराव ढाकने यांनी केले.
या महामोर्चात राज्यभरातील दोन लाख कर्मचारी सहभागी झाले गडचिरोली जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, सरचिटणीस दुधराम रोहनकर, उपाध्यक्ष संजय खोकले, ग्राम सेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपुरकर, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार, राजु रेचनकार, डॉ. विजय उईके, अर्चना श्रिगीरवार, जिवनदास ठाकरे, मोनाक्षी डोह, श्रीकृष्ण मंगर, हेमंत गेडाम यांच्या नेतृत्वात ५६३ कर्मचारी सहभागी झाले.