सहा मृत्यूसह ५६२ नवीन बाधित, ५४२ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:38 IST2021-05-07T04:38:55+5:302021-05-07T04:38:55+5:30

जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित कोरोना रुग्णांची संख्या आता २४ हजार १६० झाली आहे. त्यापैकी १९ हजार ७७ लोक कोरोनामुक्त झाले. ...

562 newly infected with six deaths, 542 corona free | सहा मृत्यूसह ५६२ नवीन बाधित, ५४२ कोरोनामुक्त

सहा मृत्यूसह ५६२ नवीन बाधित, ५४२ कोरोनामुक्त

जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित कोरोना रुग्णांची संख्या आता २४ हजार १६० झाली आहे. त्यापैकी १९ हजार ७७ लोक कोरोनामुक्त झाले. सध्या ४५९४ सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकडा ४८९ वर पोहोचला आहे.

गुरुवारी मृत्यू झालेल्या सहा नवीन रुग्णांमध्ये ८१ वर्षीय महिला देसाईगंज, ३५ वर्षीय पुरुष खेडेगाव, ता. कुरखेडा, ७४ वर्षीय पुरुष आशीर्वाद नगर, गडचिरोली, ६१ वर्षीय पुरुष सोनापूर कॉम्पलेक्स, गडचिरोली, ४४ वर्षीय पुरुष हिवरगाव, ता. चामोर्शी, ८० वर्षीय पुरुष रेगुंटा, ता. सिरोंचा यांचा समावेश आहे.

नवीन ५६२ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १९५, अहेरी तालुक्यातील ४३, आरमोरी ६५, भामरागड तालुक्यातील ११, चामोर्शी तालुक्यातील ४७, धानोरा तालुक्यातील १५, एटापल्ली तालुक्यातील २४, कोरची तालुक्यातील २४, कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये ३६, मुलचेरा तालुक्यातील बाधितांमध्ये १७, सिरोंचा तालुक्यातील २२, तर देसाईगंज तालुक्यातील ६३ जणांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या ५४२ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील १६०, अहेरी ५२, आरमोरी ५२, चामोर्शी ८०, धानोरा ११, एटापल्ली १, मूलचेरा १३, कोरची ५०, कुरखेडा ५६ तसेच देसाईगंज येथील ६७ जणांचा समावेश आहे.

Web Title: 562 newly infected with six deaths, 542 corona free