अहेरी तालुक्यात ५६ जागांसाठी ग्रा. पं. निवडणूक
By Admin | Updated: April 2, 2016 01:59 IST2016-04-02T01:59:32+5:302016-04-02T01:59:32+5:30
उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळीच जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे निवडणूक विभागाने बंधनकारक केले होते.

अहेरी तालुक्यात ५६ जागांसाठी ग्रा. पं. निवडणूक
१७ ला होणार मतदान : शनिवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख
जात पडताळणीचा अर्ज केल्याचा पुरावाही चालणार
उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळीच जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे निवडणूक विभागाने बंधनकारक केले होते. मात्र या निर्णयात बदल करून शिथीलता देण्यात आली आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने जात वैधतेसाठी पडताळणी समितीकडे दिलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा तसा अर्ज पडताळणी समितीकडे सादर केला असल्याचा अन्य कोणताही पुरावा सादर केल्यास ते ग्राह्य धरले जाणार आहे. उमेदवार निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र मात्र जोडावे लागणार आहे. उमेदवारांकडून २ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येतील असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कळविले आहे.