५५७५ विद्यार्थी देणार आज नवोदयची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:41 IST2021-08-12T04:41:53+5:302021-08-12T04:41:53+5:30
सदर परीक्षा सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशान्वये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांच्या ...

५५७५ विद्यार्थी देणार आज नवोदयची परीक्षा
सदर परीक्षा सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशान्वये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांच्या कक्षात शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आणि सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांची सभा घेण्यात आली. या सभेमध्ये नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षेत गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. सभेला माध्यमिक शिक्षणाधिकारी आर. पी. निकम, प्राथमिक शिक्षणाधिकारी हेमलता परसा, उपशिक्षणाधिकारी विवेक नाकाडे व सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
परीक्षा योग्यरीत्या पार पाडण्याकरिता जवाहर नवोदय विद्यालय घोट यांच्यामार्फत परीक्षा केंद्रांवर २२ केंद्र संचालक व जवाहर नवोदय विद्यालयातील २६ केंद्रीय पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे.
(बॉक्स)
२२ बैठी तर २२ भरारी पथके
सर्व परीक्षा केंद्रांवर पूर्णवेळ उपस्थित राहण्याकरिता २२ बैठी पथके व परीक्षा केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी २२ भरारी पथके तयार करून परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत नियोजन करण्यात आले. तसेच व्हीसीद्वारे प्रत्येक तालुक्यातील संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत निर्देश व परीक्षेबाबत मार्गदर्शन, तसेच कोविड-१९ चे सर्व नियम पाळून परीक्षा घेण्याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) फरेंद्र कुतीरकर यांनी मार्गदर्शन केले.