अडपल्ली माल येथे ५५ हजार ७०० रूपयांची दारू जप्त
By Admin | Updated: July 29, 2016 01:19 IST2016-07-29T01:19:01+5:302016-07-29T01:19:01+5:30
चामोर्शी तालुक्याच्या अडपल्ली माल येथे राहत्या घरातून देशी, विदेशी दारूची विक्री होत असल्याच्या माहितीवरून गडचिरोली ...

अडपल्ली माल येथे ५५ हजार ७०० रूपयांची दारू जप्त
एकास अटक : स्थानिक गुन्हेशाखेची कारवाई
आष्टी : चामोर्शी तालुक्याच्या अडपल्ली माल येथे राहत्या घरातून देशी, विदेशी दारूची विक्री होत असल्याच्या माहितीवरून गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी सायंकाळी ४.१५ वाजता धाड टाकून ५५ हजार ७०० रूपयांची दारू जप्त केली. याप्रकरणातील एका आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे.
निरंजन हलदार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर बिपूल चक्रवर्ती हा पसार होण्यात यशस्वी झाला. अडपल्ली माल येथे राहत्या घरातून निरंजन हलदार व बिपूल चक्रवर्ती हे दोघे दारूची विक्री करीत होते. यासंदर्भातील माहिती पोलिसांना मिळताच पीएसआय फिरोज मुलानी, पोलीस हवालदार गुरनुलो, ओमप्रकाश उंदीरवाडे, दुर्गे, वाळके, बांबोळे, वैशाली चव्हाण, चालक प्रशांत पातकमवार यांनी धाड टाकून आरोपींकडून पाच आयबीच्या पेट्या व सात देशी दारूच्या पेट्या अशा एकूण दारूच्या दहा पेट्या जप्त केल्या. एकूण ५५ हजार ७०० रूपयांच्या मालासह आरोपी निरंजन हलदार याला पोलिसांनी ताब्यात घेतले. मुलचेरा भागात देशी, विदेशी दारूसह हातभट्ट्यांचीही दारू मोठ्या प्रमाणावर विकली जात आहे. त्या तुलनेत पोलिसांचे धाडसत्र अपुरेच ठरणारे आहेत. (प्रतिनिधी)