शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

५४४ दिव्यांगांना मिळणार साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 5:00 AM

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे स्थानिक तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या परिसरात दिव्यांग शोध मोहीम, तपासणी व मोजमाप शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण १ हजार ५१ दिव्यांगांची तपासणी करून ५४४ दिव्यांगांची साहित्यासाठी निवड करण्यात आली.

ठळक मुद्देआरोग्य विभागाचा पुढाकार : देसाईगंजच्या शिबिरात १ हजार ५१ दिव्यांगांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे स्थानिक तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या परिसरात दिव्यांग शोध मोहीम, तपासणी व मोजमाप शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण १ हजार ५१ दिव्यांगांची तपासणी करून ५४४ दिव्यांगांची साहित्यासाठी निवड करण्यात आली.उद्घाटन तहसीलदार सोनवणे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी न. प. उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा होते. प्रमुख अतिथी म्हणून सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री, गटविकास अधिकारी सोयाम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक कुंभरे, मुख्याधिकारी कुलभूषण रामटेके, गटशिक्षणाधिकारी डॉ. पीतांबर कोडापे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश राऊत, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. अनुपम महेशगौरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक गहाणे, डॉ. पी. जी. सडमेक, डॉ. स्नेहल बांधरे उपस्थित होते.आशा स्वयंसेविका व अंगणवाडी कार्यकर्त्यांमार्फत शहरी व ग्रामीण भागातून १२०० दिव्यांगांची नोंदणी करण्यात आली होती. या आधारावर रविवारी तालुकास्तरीय शिबिर घेण्यात आले. दिव्यांगांची तपासणी व मोजमाप झाले. ५४४ जणांना अलिम्को संस्थेमार्फत कृत्रिम हात-पाय, अंध दिव्यांगांना छडी, मोबाईल, कर्णबधिरांना यंत्र, तीनचाकी सायकल यासह इतर साहित्याचे वितरण केले जाणार आहे.दिव्यांगांना शिबिरस्थळी ने-आण करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे सकाळपासूनच शिबिरस्थळी दिव्यांगांची गर्दी झाली. दिव्यांगांची गैरसोय होऊ नये यासाठी ६ नोंदणी कक्ष उभारण्यात आले. शिबिराकरिता आवश्यक कागदपत्रे मिळावी यासाठी तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी व नगरपरिषदेच्या वतीने स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलवर दिव्यांगांना रहिवासी दाखले, उत्पन्न दाखले देण्याची व्यवस्था करण्यात आली. मोफत झेरॉक्स, पासपोर्ट, आधारकार्ड काढण्याचीही सुविधा होती. तालुक्यातील ग्रामसेवकांनी दिव्यांगांना शिबिरस्थळी आणणे व गावाला पोहोचवून देण्याची व्यवस्था केली. तसेच आरोग्य विभागाने रूग्णवाहिका उपलब्ध केली.संचालन पॅरामेडिकल वर्कर दिनकर संदोकर, प्रास्ताविक आरोग्य सहाय्यक उमाकांत दरडमारे व चंद्रकांत चहारे तर आभार तालुका लेखापाल चंद्रकांत मेश्राम यांनी मानले. 

टॅग्स :Socialसामाजिक