पाॅलिटेक्निकच्या २१० जागांसाठी ५२५ अर्ज; दाेन वर्षांत वाढला ओढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:37 IST2021-09-19T04:37:58+5:302021-09-19T04:37:58+5:30
गडचिराेली : क्रमिक शिक्षणातून राेजगाराच्या अत्यल्प संधी मिळत असल्याने अनेक विद्यार्थी व्यवसाय, तसेच काैशल्याधिष्टीत अभ्यासक्रमाकडे वळत आहेत. याच अभ्यासक्रमाचा ...

पाॅलिटेक्निकच्या २१० जागांसाठी ५२५ अर्ज; दाेन वर्षांत वाढला ओढा
गडचिराेली : क्रमिक शिक्षणातून राेजगाराच्या अत्यल्प संधी मिळत असल्याने अनेक विद्यार्थी व्यवसाय, तसेच काैशल्याधिष्टीत अभ्यासक्रमाकडे वळत आहेत. याच अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून तंत्र शिक्षणाकडे पाहिले जाते. गडचिराेली जिल्ह्यात एकमेव असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये एकूण २१० जागांसाठी यावर्षी ५२५ विद्यार्थ्यांनी अर्ज केला. गडचिराेली जिल्ह्यात गेल्या दाेन वर्षांत तंत्र शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे.
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मागील वर्षी ६० टक्के प्रवेश झाले हाेते. यावर्षी ७५ टक्क्यांच्या वर प्रवेश निश्चित हाेतील. गेल्या दाेन वर्षांत २० ते ३० टक्क्यांनी प्रवेश क्षमता वाढल्याने ग्रामीण व दुर्गम भागातही तंत्र शिक्षणाबाबत जागृती झाल्याचे दिसून येते.
काेट
गेल्या दाेन वर्षांपासून शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश व शिक्षणानंतर राेजगाराच्या संधी यावर भर दिला जात आहे. त्यामुळे मागील वर्षी ३४ व यावर्षी ३२ विद्यार्थ्यांना बजाज ऑटाे, घुत ट्रान्समिशन, अल्ट्राटेक, आदी कंपन्यांमध्ये राेजगार मिळाला. विद्यार्थ्यांचा ओढा तंत्र शिक्षणाकडे वाढावा, यासाठी सुरुवातीला प्रत्येक शाळेत मार्गदर्शन कार्यक्रम घेऊन तंत्र शिक्षणाचे महत्त्व, राेजगाराच्या संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीणसह दुर्गम भागातही शिक्षण विभागाच्या वतीने कार्यक्रम घेऊन तंत्र शिक्षणाची क्रांती पाेहाेचविण्याचे काम शासकीय तंत्रनिकेतनच्या चमूद्वारे करण्यात आल्याने प्रवेशासाठी भरभरून प्रतिसाद मिळाला.
- डाॅ. अतुल बाेराडे, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन गडचिराेली
बाॅक्स
प्रथम वर्षाला मराठीतून मिळणार धडे
गडचिराेली येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये यंदा प्रथमच प्रथम वर्षाला मराठी भाषेतून अध्यापन केले जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सहज साेप्या भाषेत मार्गदर्शन मिळेल. याचा फायदा गुणवत्ता वाढीसाठी हाेईल.
सिव्हील व संगणक शाखेला अधिक पसंती
गडचिराेली येथील शासकीय तंत्र निकेतनमध्ये एकूण चार शाखा आहेत. यापैकी सिव्हील, संगणक शाखेला अधिक पसंती विद्यार्थ्यांनी दर्शविली आहे. त्याखालाेखाल इलेक्ट्रिक शाखेचा समावेश आहे. त्यामुळे दाेन्ही शाखांचे महत्त्व जिल्ह्याच्या दृष्टीने काय आहे, याची प्रचिती येते.
...म्हणून पॉलिटेक्निकला पसंती
मला तंत्र शिक्षणात आवड असल्याने मी गडचिराेली येथील शासकीय तंत्र निकेतनमध्ये प्रवेश घेतली आहे. मला इलेक्ट्रिकल ब्रँच मिळाली आहे. मिळालेल्या प्रवेश संधीचा याेग्य उपयाेग करून पूर्ण करून नाेकरी अथवा राेजगार मिळविण्याचा प्रयत्न करणार.
- पूजा चापले, विद्यार्थिनी
तंत्र शिक्षणात राेजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. तसेच मला तंत्र शिक्षणात आवड आहे. मला सिव्हील इंजिनिअरिंग ब्रँच मिळाली आहे. प्रवेशाच्या संधीचा सदुपयाेग करून शिक्षण घेऊन मला अभियंता बनायचे आहे. यासाठी कठाेर परिश्रम करणार आहे.
- श्लाेक मुचलवार, विद्यार्थी