५२ टक्के वृक्ष जिवंत

By Admin | Updated: October 25, 2014 22:38 IST2014-10-25T22:38:56+5:302014-10-25T22:38:56+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीच्यावतीने सन २०११-१२, २०१२-१३ व २०१३-१४ या तीन वर्षात करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची विशेष तपासणी हरितसेनेच्या शिक्षक

52 percent of trees live | ५२ टक्के वृक्ष जिवंत

५२ टक्के वृक्ष जिवंत

तपाासणीचा अंतिम अहवाल : वृक्ष संगोपनात देसाईगंज तालुका यशस्वी
गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीच्यावतीने सन २०११-१२, २०१२-१३ व २०१३-१४ या तीन वर्षात करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची विशेष तपासणी हरितसेनेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांमार्फत करण्यात आली. तपासणीच्या अंतिम अहवालानुसार जिल्ह्यातील तीनही वर्षांतील जीवंत रोपांची टक्केवारी ५२.१२ इतकी आहे. देसाईगंज तालुक्याची तीनही वर्षाची जीवंत रोपट्यांची सरासरी टक्केवारी ७० पेक्षा अधिक असल्याने वृक्ष संगोपनात देसाईगंज तालुका यशस्वी झाला असल्याचे दिसून येते.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार दरवर्षी ग्रामपंचायतीमार्फत गावपरिसरात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्ष लागवड करण्यात येते. सदर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम दरवर्षी जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात राबविला जातो. यापूर्वी ग्रामपंचायतीच्या वृक्ष लागवडीची तपासणी प्रशासकीय यंत्रणेमार्फत करण्यात आली होती. मात्र प्रशासकीय यंत्रणेने तयार केलेल्या तपासणी अहवालात पूर्णत: तथ्य आढळून आले नाही. त्यामुळे शासनाने निरपेक्ष विशेष वृक्ष लागवड तपासणी मोहीम हाती घेतली. शासनाच्या निर्णयानुसार हरित संरक्षक गटांमार्फत ग्रा.पं.च्या वृक्ष लागवडीच्या तपासणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. सदर वृक्ष लागवड तपासणी मोहीम हरित सेनेचे शिक्षक व विद्यार्थ्यांमार्फत २५ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत करण्यात आली. शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळेच्या सुटीच्या दिवशी वृक्ष लागवडीची तपासणी करून अंतिम अहवाल जि. प. प्रशासनाकडे सादर केलेला आहे. सादर करण्यात आलेल्या या अंतिम अहवालानुसार सन २०११-१२ या वर्षातील जिवंत वृक्षांची टक्केवारी ५७.१९ आहे. यात धानोरा तालुक्याची टक्केवारी २४.८४, कुरखेडा ५७.६६, देसाईगंज ७६.१३, सिरोंचा ३४.५७ टक्के आहे.
सन २०१२-१३ या वर्षात बाराही तालुक्यात ४ लाख ३७ हजार ५५३ वृक्षांची ग्रामपंचायतीमार्फत लागवड करण्यात आली होती. यापैकी नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अंतिम तपासणी अहवालानुसार जिवंत रोपट्यांची संख्या २ लाख ९० हजार ६१२ इतकी असून याची टक्केवारी ६६.४१ आहे. यामध्ये अहेरी तालुक्यातील जिवंत वृक्षांची टक्केवारी ४५.५६ टक्के आहे. आरमोरी ४८ टक्के, चामोर्शी २८.७४ टक्के, धानोरा ५२.६३ टक्के, एटापल्ली ४६.९१ टक्के, गडचिरोली ५९.२४ टक्के, कोरची ७९.६२ टक्के, कुरखेडा ५८ टक्के, मुलचेरा ४५.६० टक्के, देसाईगंज ६५.८१ टक्के व सिरोंचा तालुक्यातील जिवंत वृक्षांची टक्केवारी २६.१३ आहे.
सन २०१३-१४ या वर्षात बाराही तालुक्यातील ग्रामपंचायतीमार्फत एकूण ६ लाख ६३ हजार ७३१ वृक्ष लागवड करण्यात आली. यापैकी नुकताच करण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत २ लाख ८२ हजार ६१८ जिवंत वृक्ष असल्याचे आढळून आले. या वर्षातील जीवंत वृक्षाची टक्केवारी ४२.५८ आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: 52 percent of trees live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.