कृषी गोदामांमुळे ५ हजार टन धान्य साठवणुकीची सुविधा
By Admin | Updated: October 21, 2014 22:52 IST2014-10-21T22:52:07+5:302014-10-21T22:52:07+5:30
जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यात एकुण २५ गोदामे मंजूर करण्यात आली होती. यातील २३ गोदामांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. प्रत्येक गोदामाची साठवण क्षमता २०० टन आहे. त्यामुळे २५ गोदामांच्या

कृषी गोदामांमुळे ५ हजार टन धान्य साठवणुकीची सुविधा
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यात एकुण २५ गोदामे मंजूर करण्यात आली होती. यातील २३ गोदामांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. प्रत्येक गोदामाची साठवण क्षमता २०० टन आहे. त्यामुळे २५ गोदामांच्या माध्यमातून ५ हजार टन अन्नधान्य साठविण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. साठवणुक क्षमता वाढल्याने शेतमालाला योग्य भाव मिळण्यास मदत होणार आहे.
जिल्हा परिषदेच्यावतीने कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा, रामगड, कढोली, आरमोरी तालुक्यातील वैरागड, देलनवाडी, वडधा, कोरची तालुक्यातील बेतकाठी, मसेली, धानोरा तालुक्यातील रांगी, चातगाव, गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा, चामोर्शी तालुक्यातील तळोधी, मक्केपल्ली, पावीमुरांडा, अड्याळ, रेगडी, एटापल्ली तालुक्यातील जारावंडी, अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा, कमलापूर व सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर, असरअल्ली येथील गोदामांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. बांधकाम पूर्ण झालेल्या गोदामांचा वापर धान्य साठवणुकीसाठी केला जात आहे. कृषी गोदामाचे व्यवस्थापन स्थानिक ग्रामपंचायत स्तरावरून केल्या जात आहे. गोदामाचे व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सरपंचासह ११ सदस्यांची समिती गठित करण्यात आली असून या समितीकडे गोदामाचे भाडे आकारणे व अन्य दर ठरविण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे अन्नधान्य साठवणुकीच्या अत्यंत कमी सोयी- सुविधा आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातून माल निघाल्याबरोबरच विकावा लागत होता. परिणामी कमी किंमत मिळत होती. गोदामांमुळे ही अडचण दूर होण्यास मतद होईल, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहे. (नगर प्रतिनिधी)