५ हजार ५७५ विद्यार्थी देणार जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:33 IST2021-07-26T04:33:23+5:302021-07-26T04:33:23+5:30

सदर परीक्षेसाठी गडचिरोली येथे २ परीक्षा केंद्र असून यामध्ये शिवाजी हायस्कूल गडचिरोली ३३६ विद्यार्थी, स्कूल ऑफ स्कालर ४५० विद्यार्थी,आरमोरी ...

5 thousand 575 students will give entrance test of Jawahar Navodaya Vidyalaya | ५ हजार ५७५ विद्यार्थी देणार जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा

५ हजार ५७५ विद्यार्थी देणार जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा

सदर परीक्षेसाठी गडचिरोली येथे २ परीक्षा केंद्र असून यामध्ये शिवाजी हायस्कूल गडचिरोली ३३६ विद्यार्थी, स्कूल ऑफ स्कालर ४५० विद्यार्थी,आरमोरी येथे हितकारिणी विद्यालय २४०, महात्मा गांधी हायस्कूल आरमोरी २६५ विद्यार्थी, कुरखेडा शिवाजी हायस्कूल २५२ विद्याथी, श्रीराम विद्यालय कुरखेडा १४१, धानोरा जिल्हा परिषद हायस्कूल ३११ विद्यार्थी, एटापल्ली जिल्हा परिषद हायस्कूल १९२, राजीव गाधी हायस्कूल एटापल्ली १६८, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय १६६, सिरोंचा जिल्हा परिषद हायस्कूल २५१,तर अहेरी तालुक्यात आर. डी. कृषी विद्यालय २१६, मार्डल स्कूल अहेरी केंद्रात बदल करून भगवंतराव हायस्कूल अहेरी येथील परीक्षा केंद्रावर १५४ विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच चामोर्शी तालुक्यात आर. डी. हायस्कूल आष्टी २७६, शिवाजी हायस्कूल चामोर्शी ३९६, जे. के. बोमनवार हायस्कूल २७६, महात्मा गांधी हायस्कूल घोट २५२, देसाईगंज (वडसा) आदर्श इंग्लीश हायस्कूल ३८४, परम पूज्य बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल १५९ तर कोरची तालुक्यात पार्वताबाई विद्यालय कोरची या परीक्षा केंद्रावर २५० विद्याथी, भामरागड समूह निवासी हायस्कूल १९०, मुलचेरा तालुक्यात आर. डी. हायस्कूलच्या केंद्रावर २५० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालयाच्या संकेतस्थळावर जाऊन प्रवेशपत्र प्राप्त करावे तसेच अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालयाशी संपर्क साधावा, असे घोट जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एम.एन. राव, उपप्राचार्य राजन गजभिये, परीक्षा प्रमुख आर. एस. धाबर्डे यांनी कळविले आहे.

Web Title: 5 thousand 575 students will give entrance test of Jawahar Navodaya Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.