४९ लाकूड पाट्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:20 IST2017-11-11T23:19:54+5:302017-11-11T23:20:05+5:30
देसाईगंज वन विभागाच्या फिरत्या पथकाने पिसेवडधा क्षेत्रातील येंगाळा या गावात शनिवारी दुपारी १२ वाजता धाड टाकून २५ हजार रूपये किमतीचे सागवान व बिजा लाकडाच्या ४९ पाट्या जप्त करण्यात आल्या आहे.

४९ लाकूड पाट्या जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : देसाईगंज वन विभागाच्या फिरत्या पथकाने पिसेवडधा क्षेत्रातील येंगाळा या गावात शनिवारी दुपारी १२ वाजता धाड टाकून २५ हजार रूपये किमतीचे सागवान व बिजा लाकडाच्या ४९ पाट्या जप्त करण्यात आल्या आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येंगाळा येथील भैय्यासिंग सूर्यभान चव्हाण याच्या घरी लाकडाच्या पाट्या ठेवल्या असल्याची गुप्त माहिती देसाईगंज वन विभागाच्या फिरत्या पथकाला प्राप्त झाली. त्यानुसार या पथकाने भैय्यासिंग चव्हाण यांच्या घराची झडती घेतली असता, त्याच्या घरी बिजा व सागवानी लाकडाच्या पाट्या आढळून आल्या. भैय्यासिंग चव्हाण व विलास बावणे हे दोघेही लाकूड कारागीर म्हणून काम करीत होते. त्यामुळे या प्रकरणात विलास बावणे व भैय्यासिंग चव्हाण या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई भरारी पथकाचे क्षेत्र सहायक वंजारी, कुमरे, गहाणे, कानकाटे यांनी केली. सदर मुद्देमाल वैरागडचे वनरक्षक श्रीकांत सेलोटे यांच्याकडे ठेवण्यात आला आहे.