४८४ महिलांची आरोग्य तपासणी

By Admin | Updated: March 15, 2015 01:10 IST2015-03-15T01:10:27+5:302015-03-15T01:10:27+5:30

सिरोंचा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या उपकेंद्रांमध्ये महिला आरोग्य अभियानानिमित्त आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

484 women's health check-up | ४८४ महिलांची आरोग्य तपासणी

४८४ महिलांची आरोग्य तपासणी


झिंगानूर : सिरोंचा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या उपकेंद्रांमध्ये महिला आरोग्य अभियानानिमित्त आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरादरम्यान सुमारे ४८४ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्र झिंगानूर येथील आरोग्य शिबिराचा शुभारंभ झिंगानूरच्या सरपंच निलीमा मडावी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी १९४ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये १२० महिलांचा समावेश आहे. तपासणीदरम्यान रक्तदाबाचे ४१, सिकलसेल ५६, मधूमेहाचे ६७ रूग्ण आढळून आले. कोपेला उपकेंद्रात ५७ महिलांची तपासणी करण्यात आली. कोर्ला येथील आरोग्य उपकेंद्रात कोर्लाचे उपसरपंच मनोहर चेडे यांच्या हस्ते आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आला. या शिबिरात १०३ महिला लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. सोमनपल्ली उपकेंद्रातील आरोग्य शिबिराला पुष्पलता आसम, उपसरपंच विश्वेश्वरराव येतम उपस्थित होते. या शिबिरात एकूण १६१ लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये १२२ महिला लाभार्थ्यांचा समावेश आहे. पातागुडम आरोग्य केंद्रात एकूण १४० नागरिकांची तपासणी झाली. यामध्ये ८४ महिला लाभार्थ्यांचा समावेश आहे.
आरोग्य शिबिर आयोजित करण्यासाठी झिंगानूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक लाटकरी, डॉ. सुधीर राऊत, डॉ. मिलिंग बागडे, डॉ. चेतना उईके, डॉ. मनीष चव्हाण, डॉ. उमेश गायकवाड, निर्मला जाकावार, प्रकाश लाडे, जाकीर अली, मो. रफी, ठाकरे, राकेश डबरे, राकेश शर्मा, प्रियंका वानखेडे, शारदा अंकम, मनोज कुंभारे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ खैरकर, एस. एन. जनगम, व्ही. एल. नगराळे, दर्शना नेवारे, मंदा दुर्गे, नंदा टाळकर, किरण दांडे, दीपांती बिश्वास, प्रियंका खेवले, मनीषा कोठारकर, मेघा कंकडालवार यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: 484 women's health check-up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.