सिरोंचा मार्गासाठी ४८ कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 23:53 IST2017-11-08T23:52:59+5:302017-11-08T23:53:09+5:30
आलापल्ली-सिरोंचा हा १०० किमी अंतराच्या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली होती. या मार्गावर अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत होती.

सिरोंचा मार्गासाठी ४८ कोटी मंजूर
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : आलापल्ली-सिरोंचा हा १०० किमी अंतराच्या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली होती. या मार्गावर अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. सदर समस्येची दखल घेऊन राज्याचे आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटून सदर मार्गाचे काम मंजूर करून घेतले. आलापल्ली-सिरोंचा मार्गासाठी राज्य शासनाने ४८ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे.
निधी मंजूर झाला असून सदर निधी प्रशासनाकडे लवकरच वळता करण्यात येणार आहे. त्यानंतर आलापल्ली-सिरोंचा या मार्गाचे काम हाती घेण्यात येणार असून हा रस्ता गुळगुळीत होणार आहे. सदर रस्त्याच्या दुरवस्थेबाबत अहेरी उपविभागातील नागरिकांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना भेटून तसेच निवेदन देऊन रस्ता दुरूस्तीची मागणी केली होती. त्यावेळी पालकमंत्र्यांनी नागरिकांना सकारात्मक आश्वासन दिले होते. पाठपुरावा करून पालकमंत्र्यांनी निधी मंजूर करून घेतला आहे.