शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

१७ वर्षात दगावले ४७९ एचआयव्ही रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2019 6:00 AM

जिल्ह्यात ३० जानेवारी २००२ ला पहिल्यांदा आयसीटीसी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रामार्फत एचआयव्ही एड्स आजाराविषयी जनजागृती तसेच शासकीय रूग्णालयात तपासणी मार्गदर्शन व औषधोपचार पूर्णपणे मोफत केला जात आहे. याशिवाय रूग्णांना विनामूल्य माहिती उपलब्ध व्हावी, याकरिता १०९७ टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । १ हजार ५४६ आजारग्रस्तांची नोंद; १ हजार ६७ रूग्णांवर सुरळीत उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अतिशय गंभीर रोग म्हणून ओळख असलेल्या एचआयव्ही एड्सचे जिल्ह्यात व जिल्हाबाहेरून गेल्या १७ वर्षात १ हजार ५४६ रूग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ४७९ रूग्ण या आजारामुळे दगावले आहेत. तर १ हजार ६७ रूग्ण एआरटी औषधोपचार सुरळीत घेत आहेत.जिल्ह्यात ३० जानेवारी २००२ ला पहिल्यांदा आयसीटीसी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रामार्फत एचआयव्ही एड्स आजाराविषयी जनजागृती तसेच शासकीय रूग्णालयात तपासणी मार्गदर्शन व औषधोपचार पूर्णपणे मोफत केला जात आहे. याशिवाय रूग्णांना विनामूल्य माहिती उपलब्ध व्हावी, याकरिता १०९७ टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. याचा फायदा एचआयव्ही रूग्णांसह शंकांचे निरसन करणाऱ्या व्यक्तींना होत आहे. त्यामुळे समाजात एचआयव्ही एड्स निर्मूलनाविषयी मानसिकता तयार होऊन जागृतीही होत आहे.एमडीआर पद्धतीमुळे बाळांना आजारापासून दूर ठेवता येतेएचआयव्ही एड्स असुरक्षित लैैंगिक संबंध, एचआयव्ही संसर्गित रक्त, संसर्गित इंजेक्शन, सुई व अन्य उपकरणे तसेच एचआयव्ही संसर्गित गरोदर मातेकडून तिच्या बाळाला होतो. या चार कारणांमुळे एड्स होण्याची शक्यता असते. बाळांपर्यंत एड्सचा प्रसार थांबविल्या जाऊ शकतो. यासाठी एमडीआर ही नवीन उपचार पद्धती आली आहे. पालकांकडून शिशूकडे प्रसार प्रतिबंधक उपाय असे या पद्धतीचे नाव आहे. प्रतिबंधासाठी लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. यासाठी रूग्णालयातील आयसीटीसी केंद्राशी संपर्क साधून तेथील समुपदेशकांचा सल्ला घ्यावा. सर्व सरकारी रूग्णालयात प्रसूतीपूर्व चिकित्सा विभागातील आयसीटीसी केंद्रात ही सेवा उपलब्ध आहे. येथे उपचार घेतल्यास बाळांना एचआयव्ही संसर्गापासून दूर ठेवता येऊ शकते.नैतिक मूल्यांचे महत्त्व अधिकजीवनात नैतिक मूल्यांना अधिक महत्त्व आहे. समाजाला व विशेषत: तरूणांना एचआयव्हीची लागण होऊ नये, यासाठी शालेय जीवनापासूनच मुलांमध्ये शिस्त, नैतिक मूल्य जोपासण्याचे संस्कार तरूण अवस्थेतील हालचालींकडे लक्ष म्हणून मित्र संगतीकडे लक्ष द्यावे. तसेच वडिलांनी मुलांचे मित्र बनून वागावे. नैतिक मूल्य ढासळणार नाही यासाठी मुलांवर योग्य संस्कार करून त्यांना वेळोवळी मार्गदर्शन केल्यास संस्कारक्षम पिढी निर्माण होईल.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स