४७ टक्के धानाची रोवणी आटोपली

By Admin | Updated: July 31, 2016 02:13 IST2016-07-31T02:13:06+5:302016-07-31T02:13:06+5:30

कृषी विभागाने जिल्हाभरात केलेल्या पाहणीनुसार २६ जुलै पर्यंत ४७ टक्के रोवणीची कामे आटोपली आहेत.

47 percent of the money was stopped! | ४७ टक्के धानाची रोवणी आटोपली

४७ टक्के धानाची रोवणी आटोपली

निम्म्या क्षेत्रावर आवत्या : ७१ हजार ८५९ हेक्टरवर लागवडीचे नियोजन
गडचिरोली : कृषी विभागाने जिल्हाभरात केलेल्या पाहणीनुसार २६ जुलै पर्यंत ४७ टक्के रोवणीची कामे आटोपली आहेत. एकूण भात लागवड क्षेत्राच्या सुमारे ३७ हजार १९८ हेक्टरवर भाताची रोवणी झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील धान हे प्रमुख पिक आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात ७१ हजार ८५९ हेक्टरवर धान पिकाची लागवड केली जाईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. गडचिरोली जिल्ह्यात धानाचे सर्वसाधारण क्षेत्र सुमारे १ लाख ५३ हजार २२८ हेक्टर आहे. सुरूवातीच्या पावसात ज्या शेतकऱ्यांनी धानाची पऱ्हे टाकली होती. अशा शेतकऱ्यांनी १५ दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसादरम्यान रोवणीच्या कामाला सुरूवात केली होती. मात्र काही तालुक्यात पहिला पाऊस दमदार झाला नाही. त्यामुळे त्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी धानाची पऱ्हे टाकली नव्हती. त्यानंतर सतत पाऊस झाल्याने रोवणीची कामे खोळंबली. अशा शेतकऱ्यांचे रोवणे झाले नाही.
भात रोवणीला पर्याय म्हणून काही शेतकरी आवत्या टाकतात. चालू वर्षात ३४ हजार ६६१ हेक्टरवर आवत्या पध्दतीने धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. २६ जुलैपर्यंत गडचिरोली तालुक्यात ६ हजार ६२६ हेक्टरवर भात पिकाची लागवड झाली आहे. त्यात ३ हजार १४२ हेक्टरवर आवत्या टाकण्यात आला आहे. कुरखेडा तालुक्यात ६ हजार ५३४ हेक्टरवर रोवणी तर १ हजार ८६३ हेक्टरवर आवत्या, आरमोरी तालुक्यात ९ हजार ८०० हेक्टरवर रोवणी तर ४ हजार २५० हेक्टरवर आवत्या, चामोर्शी तालुक्यात ३ हजार ८०४ हेक्टरवर रोवणी तर १ हजार २६६ हेक्टरवर आवत्या टाकण्यात आला आहे. सिरोंचा तालुक्यात ७५१ हेक्टरवर आवत्या पध्दतीने लागवड केली आहे. अहेरी तालुक्यात १ हजार २६ हेक्टरवर रोवणीची कामे आटोपली आहेत. एटापल्ली तालुक्यात ३८९ हेक्टर, धानोरा ३ हजार ७९९, कोरची १ हजार ६००, देसाईगंज ३ हजार ७९४, मुलचेरा १ हजार ७० तर भामरागड तालुक्यात ७५६ हेक्टरवर रोवणीची कामे आटोपली आहेत. असे एकूण ३७ हजार १९८ हेक्टरवर रोवणी झाली आहे. (नगर प्रतिनिधी)

पावसाअभावी कामे थांबली
मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. दिवसभर कडक ऊन पडत असल्याने धानाच्या बांधीमधील पाणी पूर्णपणे आटले आहे. त्यामुळे धान रोवणीची कामे जिल्हाभरात ठप्प पडले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असेच शेतकरी धानाची रोवणी करीत आहेत. धान रोवणीची कामे थांबल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. जेवढ्या उशीरा धानाची रोवणी होते, तेवढीच उत्पादनात घट होते. सिंचन विभागाच्या अखत्यारित असलेले संपूर्ण तलाव तुडूंब भरले आहेत. त्यामुळे सदर तलावाचे पाणी सोडण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. पाणी न सुटल्यास रोवणीची कामे थांबणार आहेत.

 

Web Title: 47 percent of the money was stopped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.