४७ दुधाळू जनावरे गट मंजूर
By Admin | Updated: March 15, 2015 01:11 IST2015-03-15T01:11:56+5:302015-03-15T01:11:56+5:30
राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचित जाती, नवबौद्ध लाभार्थ्यांना दुधाळू गाई-म्हशींचे वाटप २०१४-१५ यावर्षात केले जाणार आहे.

४७ दुधाळू जनावरे गट मंजूर
गडचिरोली : राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचित जाती, नवबौद्ध लाभार्थ्यांना दुधाळू गाई-म्हशींचे वाटप २०१४-१५ यावर्षात केले जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ४७ लाभार्थ्यांना दुधाळू जनावरांचे गट मंजूर करण्यात आले आहे. यात ३० टक्के महिला लाभार्थ्यांची प्राधान्याने निवड करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार यांनी दिली आहे.
शेती हंगामात शेतमालाचे उत्पन्न करून मिळेल त्या भावात विक्री करून आपले जीवन न जगता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांकडून बोध घेऊन दुग्ध व्यवसायातून आपली प्रगती करावी, याकरिता सदर दुधाळू जनावर गट मंजूर करण्यात आले आहे. गडचिरोली तालुक्यात नऊ लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले. यापैकी चार लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. तर चार लाभार्थ्यांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले. आरमोरी तालुक्यातील १५ लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले. यापैकी तीन लाभार्थ्यांची निवड झाली. तर तीन प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले.
चामोर्शी तालुक्यात १८ प्रस्ताव प्राप्त झाले. पैकी चार लाभार्थ्यांची निवड तर चार लाभार्थी प्रतीक्षा यादीत, धानोरा तालुक्यात सहा प्रस्ताव प्राप्त, चार जणांची निवड, दोन जणांचा प्रतीक्षा यादीत समावेश करण्यात आला. मुलचेरा तालुक्यात आठ प्रस्ताव प्राप्त, एकाची निवड तर एक प्रतीक्षा यादीत, भामरागड तालुक्यात १० प्रस्ताव प्राप्त, दोन लाभार्थ्यांची निवड तर दोन प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले. कुरखेडा तालुक्यात १३ प्रस्ताव प्राप्त, तीन लाभार्थ्यांची निवड तर तीन जणांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले. कोरची तालुक्यात दोन प्रस्ताव प्राप्त, एकाची निवड तर एक प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले. देसाईगंज तालुक्यात सात प्रस्ताव प्राप्त, तीन लाभार्थ्यांची निवड तर तीन प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले. अहेरी तालुक्यात १६ लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्राप्त, आठ जणांची निवड तर आठ लाभार्थ्यांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले.
एटापल्ली तालुक्यात ११ प्रस्ताव प्राप्त, दोन जणांची निवड तर दोन जणांना प्रतीक्षा यादीत, सिरोंचा तालुक्यात २५ लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्राप्त, १२ लाभार्थ्यांची निवड तर १२ लाभार्थ्यांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जागृत होऊन अधिकाधिक लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, शासनाकडे अधिकच्या निधीकरिता पाठपुरावा करून शेतकरी, शेतमजूर व गरजू लोकांना योजनेचा लाभ देता येईल. त्यामुळे नागरिकांनी जागृत व्हावे, असे आवाहन कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार, जि. प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बुरले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आशा गेडाम, पशुधन विकास अधिकारी डॉ. रामटेके यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)