४७ विद्यार्थिनींना मिळाल्या सायकली
By Admin | Updated: August 24, 2015 01:32 IST2015-08-24T01:32:23+5:302015-08-24T01:32:23+5:30
मानव विकास मिशन कार्यक्रमांतर्गत पाच किमी अंतरावरून शाळेत पोहोचणाऱ्या विद्यार्थिनींना सायकली देण्याची योजना जिल्ह्यात राबविली जात आहे.

४७ विद्यार्थिनींना मिळाल्या सायकली
गौरीपूर व चातगाव येथे कार्यक्रम : शाळेत पोहोचणे झाले आता सुलभ
चामोर्शी/चातगाव : मानव विकास मिशन कार्यक्रमांतर्गत पाच किमी अंतरावरून शाळेत पोहोचणाऱ्या विद्यार्थिनींना सायकली देण्याची योजना जिल्ह्यात राबविली जात आहे. या योजनेंतर्गत धानोरा तालुक्यातील चातगाव व चामोर्शी तालुक्यातील गौरीपूर येथील शालेय विद्यार्थिनींना सायकलीचे वितरण शनिवारी करण्यात आले.
चातगाव येथील कै. महेश सावकार पोरेड्डीवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात ४१ विद्यार्थिनींना सायकलचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच नीता मडावी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच लक्ष्मी सयाम, प्राचार्य टी. के. बोरकर, माजी उपसरपंच राजू ठाकरे, पोलीस पाटील गोविंदा मडावी उपस्थित होते.
चामोर्शी तालुक्यातील गौरीपूर येथील लोकमान्य हिंदी माध्यमिक विद्यालयात जि. प. सदस्य डॉ़ तामदेव दुधबळे यांच्या हस्ते सहा विद्यार्थिनींना सायकलचे वितरण करण्यात आले़ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सुनील रॉय, माजी सरपंच बिधान रॉय, अशोक बिश्वास, वासुदेव रॉय, चित्त कैय्या, मुख्याध्यापक व्ही. एफ़ रायपुरे तथा कर्मचारी उपथित होते़ मानव विकास कार्यक्रम अंतर्गत विष्णुपूरवरून येणाऱ्या नववी व दहावीतील सहा विद्यार्थिनींना सायकल वितरण करण्यात आले. विद्यार्थिनींना सायकल मिळाल्यामुळे त्यांचा गाव ते शाळा पायी होणारा प्रवास आता सुलभ होईल, अशी भावना विद्यार्थिनींनी व्यक्त केली.