जिल्ह्यातील ४६ मतदान केंद्रात बदल
By Admin | Updated: October 13, 2014 23:20 IST2014-10-13T23:20:03+5:302014-10-13T23:20:03+5:30
जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी मतदार संघातील एकूण ४६ मतदान केंद्र बदलाचा प्रस्ताव भारत निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता प्राप्त झाली

जिल्ह्यातील ४६ मतदान केंद्रात बदल
गडचिरोली : जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी मतदार संघातील एकूण ४६ मतदान केंद्र बदलाचा प्रस्ताव भारत निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता प्राप्त झाली असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी रणजीत कुमार म्हणाले, जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे राज्याचे प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत भारत निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. आरमोरी विधानसभा मतदारसंघातील सात, गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील सहा आणि अहेरी विधानसभा मतदार संघातील सर्वाधिक ३३ मतदान केंद्रात फेरबदल करण्यात आले असून एकूण ४६ मतदान केंद्रात बदल करण्यात आले आहेत.
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्र्र, कंसात फेरबदलानंतरचे मतदान केंद्र. ६७ आरमोरी विधानसभा मतदार संघ - ३९ लेकूरबोडी (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नवेझरी), १३६ नडेकाल/ बेतकाठी (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डोलडोंगरी), २५४ दराची (जिल्हा परिषद उच्च श्रेणी शाळा, सुरसुंडी), २५५ चारवाही (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक १, तुमडीकसा), २५६-चारवाही- गुरेकसा (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक २, तुमडीकसा), २५७ - कटेझरी (ग्रामपंचायत कार्यालय, देवसूर), २६०- कुलभट्टी (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चरवीदंड).
६८ गडचिरोली विधानसभा मतदार संघ - ४८ दराची (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्र.२, मालंदा), १४८ मुंगनेर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,चव्हेला), १५० कामथळा (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,कामनगड), १६० जप्पी (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुरगाव), १६१ पुसटोला ( ग्रामपंचायत कार्यालय, फुलबोडी), २४८ ढेकणी (जिल्हा परिषद उच्चश्रेणी प्राथमिक शाळा, इमारत क्रमांक २, ६९ - अहेरी विधानसभा मतदार संघ -१० वेगनूर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक २, रेगडी), १५ दोलंदा (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक २, जारावंडी), १९ भापडा (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक ३, जारावंडी), २० सोहगाव (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक ४, जारावंडी), २१ गुंडम (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक ३, घोटसूर), २३ गडदापल्ली (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक २, कोटमी), ७६ मानेवारा (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक २, घोटसूर), ७७ मेढरी (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक २, सेवारी स.), ७८ जव्हेली खुर्द (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक ३, ७९ कचलेर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक ३, हालेवारा), ८० बुर्गी- म. पिपली (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक ४, हालेवारा), ८१ कुद्री (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक ५, हालेवारा), ११३ पुसकोटी (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक २, गर्देवाडा), ११४ वांगेतुरी (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गर्देवाडा), ११९ विसामुंडी (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक २, ताडगाव), १२३ गुर्जा - बुज (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मेडपल्ली), १७३ पोयरकोटी (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक २, कोटी), १७४ होडरी (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक २, लाहेरी), १७५ बिनागुंडा (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक ३, लाहेरी), १७९ नेलगुंडा (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक २, दोडराज), १८० गोंगवाडा (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक ३, धोडराज), १८१ भटपार (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक ४, धोडराज), १८२ गोलागुडा (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक ५, धोडराज), १८६ पल्ली (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक २, ताडगाव), १९२ येचली (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक ३, मन्नेराजाराम), १९३ ब्राम्हणपल्ली (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक ३, मन्नेराजाराम), १९४ कुरूमपल्ली (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक २, पल्ले), १९५ कोडसेपल्ली (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक २, येरमनार), २०५ आशा (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक २, कमलापूर), २१६ रेगुलवाही (जिल्हा परिषद उच्च श्रेणी प्राथमिक शाळा, इमारत क्रमांक २, मरपल्ली), २३० कल्लेड स. (अंगणवाडी केंद्र, मेटीगुडम), २६४ अहमदअली (अंगणवाडी केंद्र, चिटूर), २६७ पातागुडम (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्र. २, कोर्लामाल). अशाप्रकारे मतदान केंद्रात फेरबदल करण्यात आले आहेत, याची संबंधीत गावातील मतदारांनी नोंद घेऊन निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)