४५२ मतदारांनी बजाविला हक्क
By Admin | Updated: December 25, 2016 01:39 IST2016-12-25T01:39:14+5:302016-12-25T01:39:14+5:30
अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी प्रक्रियेस शनिवारी सकाळी ८ वाजतापासून प्रारंभ झाला आहे.

४५२ मतदारांनी बजाविला हक्क
अहेरी बाजार समिती : विभाजनानंतर पहिल्यांदाच झाली निवडणूक
अहेरी : अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी प्रक्रियेस शनिवारी सकाळी ८ वाजतापासून प्रारंभ झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, व्यापारी, सहकार या तिन्ही मतदारसंघातून ५७४ मतदारांपैकी ४५२ मतदारांनी मतदान केले आहे. विशेष म्हणजे मतदान प्रक्रिया मशीनद्वारे न घेता जुन्या पद्धतीने घेतली जात आहे. यामुळे मतदारांमध्ये संभ्रमावस्था आहे.
अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन होऊन सिरोंचा व अहेरी बाजार समिती वेगवेगळ्या झाल्या आहेत. शनिवारी अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी सकाळी ८ वाजतापासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. दुपारी ३ वाजेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून ३५१ मतदारांपैकी २४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे तर व्यापारी मतदासंघातून ३९ पैकी ३४ जणांनी मतदान केले आहे. सहकारी क्षेत्र संघातून १८४ पैकी १७५ मतदारांनी मतदान केले आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान चालले. उद्या रविवार २५ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. येथे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम, जि.प. सभापती अजय कंकडालवार यांचे पॅनल मैदानात लढत देत आहे.