शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

४५ टक्के शेतकरी अत्यल्प भूधारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 5:00 AM

देशाच्या स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात जंगलतोड करून त्या जमिनीवर शेती करण्याला सुरूवात झाली. त्यामुळे शेतीचे क्षेत्र वाढले. त्याचबरोबर लोकसंख्यासुद्धा वाढल्याने शेतीचे तुकडे पडण्याचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ लाख ३४ हजार ८३३ शेतकरी आहेत. त्यापैकी सुमारे ५७ हजार ३४२ शेतकऱ्यांकडे १ हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाची माहिती : आधुनिक तंत्रज्ञान वापरताना येतात मर्यादा;अनेकांनी सोडली शेती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीचे तुकडे होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्यास्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांच्या सुमारे ४५ टक्के शेतकऱ्यांकडे १ हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन आहे. शेतजमीन कमी असल्याने याठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे संबंधित शेतकऱ्याला कठिण झाले आहे.देशाच्या स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात जंगलतोड करून त्या जमिनीवर शेती करण्याला सुरूवात झाली. त्यामुळे शेतीचे क्षेत्र वाढले. त्याचबरोबर लोकसंख्यासुद्धा वाढल्याने शेतीचे तुकडे पडण्याचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ लाख ३४ हजार ८३३ शेतकरी आहेत. त्यापैकी सुमारे ५७ हजार ३४२ शेतकऱ्यांकडे १ हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास कमी मनुष्यबळात अधिक व दर्जेदार उत्पादन घेणे शक्य होते. मात्र शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान महाग राहत असल्याने अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला ते खरेदी करणे शक्य होत नाही. परिणामी शेतीचा विकास रखडला आहे. अल्प शेतीतून वर्षभराची गूजरान होईल, एवढे उत्पन्नसुद्धा मिळत नसल्याने काही शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतीचे होत असलेले तुकडीकरण ही गंभीर समस्या बनत चालली आहे.शेतीकडे पाठ फिरविलेले शेतकरी दुसºया शेतकºयाला शेतजमीन कसण्यासाठी देतात. एक ते दोन वर्षाचा करार राहत असल्याने दुसरा शेतकरीसुद्धा या शेतीत नवीन तंत्रज्ञान बसवू शकत नाही. विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी धान शेतीकडेच विशेष लक्ष देत असल्याचे दिसून येते.३६ हजार शेतकऱ्यांकडे २५ टक्के शेतजमीनदोन व त्यापेक्षा अधिक हेक्टर शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांची संख्या गडचिरोली जिल्ह्यात ३६ हजार २५ एवढी आहे. जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांच्या हे प्रमाण २५ टक्के एवढे आहे. हे शेतकरी काही प्रमाणात आपल्या शेतीत अत्याधुनिक सुविधा निर्माण करीत आहेत. तसेच वर्षभराची गूजरान शेतीच्या माध्यमातून होत असल्याने ते शेतीकडे विशेष लक्ष देत आहेत.गटशेतीवर शासनाचा भरअल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला शेतीचे आधुनिक महागडे तंत्रज्ञान खरेदी करणे शक्य होत नाही. तसेच एका शेतकºयाला लाखो रूपयांचे तंत्रज्ञान अनुदानावर देणे शासनालाही परवडत नाही. त्यामुळे शासनाने गट शेतीवर भर दिला आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे गट तयार केले जात आहे. या शेतकरी गटाला शासनाकडून विविध प्रकारच्या सुविधा व तंत्रज्ञान दिले जात आहे. या तंत्रज्ञानाचा वापर गटातील शेतकरी करतात. त्यामुळे शेतीचा विकास होण्यास मदत होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती