४४७ कोरोनामुक्त, तर २७२ बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:37 IST2021-04-27T04:37:31+5:302021-04-27T04:37:31+5:30

रविवारी ४५२४ वर गेलेला सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा सोमवारी कमी होऊन ४३३६ वर आला. यादरम्यान २४ तासांत १३ मृत्यूची ...

447 free from corona, while 272 affected | ४४७ कोरोनामुक्त, तर २७२ बाधितांची भर

४४७ कोरोनामुक्त, तर २७२ बाधितांची भर

रविवारी ४५२४ वर गेलेला सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा सोमवारी कमी होऊन ४३३६ वर आला. यादरम्यान २४ तासांत १३ मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ३३५ झाला आहे.

नवीन मृत्यूमध्ये गडचिरोली येथील ६२ वर्षीय पुरुष, अहेरी येथील ७० वर्षीय पुरुष, सोमलवाडा जिल्हा नागपूर येथील ४९ वर्षीय महिला, सालईटोला (ता. कुरखेडा) येथील ६५ वर्षीय महिला, धानोरा येथील ६६ वर्षीय पुरुष, नवेगाव गडचिरोली येथील ३८ वर्षीय पुरुष, चंद्रपूर येथील ३८ वर्षीय पुरुष, इंदिरा वार्ड, एटापल्ली येथील ४८ वर्षीय पुरुष, बल्लारशा (जि. चंद्रपूर) येथील ५२ वर्षीय पुरुष, हनुमाननगर ब्रम्हपुरी येथील ५५ वर्षीय पुरुष, स्नेहनगर गडचिरोली येथील ७५ वर्षीय पुरुष, आरमोरी येथील ५४ वर्षीय पुरुष, जेप्रा, गडचिरोली येथील ४१ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्याचा मृत्युदर १.७७ टक्के झाला आहे.

नवीन २७२ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १७१, अहेरी तालुक्यातील ९, आरमोरी २७, भामरागड तालुक्यातील ८, चामोर्शी तालुक्यातील १४, धानोरा तालुक्यातील ९, एटापल्ली तालुक्यातील १, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये १३, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये ३, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये ११, तर वडसा तालुक्यातील बाधितांमध्ये सहाजणांचा समावेश आहे.

कोरोनामुक्त झालेल्या ४४७ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील १८८, अहेरी ३३, आरमोरी २८, भामरागड ५, चामोर्शी २४, धानोरा ८, एटापल्ली २१, मुलचेरा १४, सिरोंचा ११, कोरची ३२, कुरखेडा ४३, तसेच देसाईगंज येथील ४० जणांचा समावेश आहे.

Web Title: 447 free from corona, while 272 affected