४४ जण झाले कनिष्ठ सहायक

By Admin | Updated: December 22, 2016 02:12 IST2016-12-22T02:12:50+5:302016-12-22T02:12:50+5:30

जिल्हा परिषदेअंतर्गत वर्ग ४ चे कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्यांपैकी ४४ कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली

44 were junior assistants | ४४ जण झाले कनिष्ठ सहायक

४४ जण झाले कनिष्ठ सहायक

कोटा वाढला : चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती
गडचिरोली : जिल्हा परिषदेअंतर्गत वर्ग ४ चे कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्यांपैकी ४४ कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली असून त्यांना कनिष्ठ सहायक पदावर नेमण्यात आले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र शासनाने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा कोटा २५ टक्केवरून ५० टक्के एवढा केला. त्या अनुषंगाने चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेने पदोन्नतीची कार्यवाही करण्याबाबत प्रशासनाला विनंती केली होती. त्यावरून २१ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समूपदेशन वर्ग घेण्यात आले. या समूपदेशन वर्गादरम्यान ४४ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ देण्यात आला. समूपदेशन सभेला उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी राऊत, सहायक प्रशासन अधिकारी खेवले, विभागीय संघटक कैलास भोयर, जिल्हा सरचिटणीस राजू रेचनकर, सल्लागार दिवाकर मेश्राम, संघटक गजानन ठाकरे, टिकाराम मंगल, गंगाराम वेलादी, संतोष कस्तुरे, शशिकांत कारवा आदी उपस्थित होते. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा कोटा वाढावा, यासाठी जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेने मोठा लढा दिला होता. (नगर प्रतिनिधी)

Web Title: 44 were junior assistants