अहेरी तालुक्यात ४३ नामांकन अर्ज अवैध
By Admin | Updated: April 12, 2015 02:08 IST2015-04-12T02:08:12+5:302015-04-12T02:08:12+5:30
तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक व रिक्त झालेल्या जागांसाठी १० ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

अहेरी तालुक्यात ४३ नामांकन अर्ज अवैध
अहेरी : तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक व रिक्त झालेल्या जागांसाठी १० ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. २२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी एकूण ७३८ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. यापैकी छाणनीअंती ४३ नामांकन अर्ज अवैध ठरले आहेत. ६९५ अर्ज अवैध ठरले आहेत. विशेष म्हणजे, १० ग्रा.पं. च्या पोटनिवडणुकीसाठी एकही नामांकन अर्ज दाखल झाला नाही.
अहेरी तालुक्यात एकूण २३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत ८२ प्रभागासाठी मतदानाची प्रक्रिया घेण्यात येणार आहे. यामध्ये मतदारांना २३ ग्रामपंचायतीमध्ये २३१ सदस्य निवडून द्यायचे आहेत. २३ ग्रामपंचायतीच्या हद्दीत एकूण ५३ हजार ८०५ मतदार संख्या असून यामध्ये २६ हजार ९९३ पुरूष व २६ हजार ८१२ महिला मतदारांचा समावेश आहे. अहेरी तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी ३४, अनुसूचित जमातीसाठी १४१, इतर मागास प्रवर्गासाठी १७ व इतर प्रवर्गासाठी ३९ सदस्यांच्या जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अहेरी तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ७३८ नामांकन अर्ज दाखल झाले. यामध्ये अनुसूचित जातीकरिता असलेल्या ३४ राखीव जागांसाठी १२७, अनुसूचित जमातीच्या १३४ राखीव जागांसाठी एकूण ३८३ नामांकन अर्ज प्राप्त झाले आहे. इतर मागास वर्गीयांच्या १७ जागांसाठी ५८ नामांकन अर्ज तर खुल्या प्रवर्गातील ३९ जागांसाठी १७० नामांकन अर्ज दाखल झाले आहे.