शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

४३ शेततळे, ७९ बंधारे

By admin | Updated: September 16, 2014 01:56 IST

कृषी विभागाच्यावतीने गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात

दोन वर्षात : सिंचन सुविधा वाढविण्यास मदत, धान शेतीस उपयोगीगडचिरोली : कृषी विभागाच्यावतीने गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात एकूण ४३ शेततळे व ७९ सिमेंट काँक्रीट व मातीचे बंधारे बांधण्यात आले. या शेततळे व बंधाराच्या माध्यमातून शेकडो हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे. राज्य शासनाच्यावतीने जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत संपूर्ण राज्यभरात शेततळे व सिमेंट काँक्रीट तसेच मातीचे बंधारे बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून राबविल्या जात आहे. शेतालगतच्या विहिरीच्या पाण्याच्या पातळी वाढ व्हावी. तसेच पाण्याच्या साठवणूक क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी राज्य शासनाने ही महत्वपूर्ण योजना अंमलात आणली. या योजनेची अंमलबजावणी कृषी विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत सन २०१२-१३ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात एकूण तीन शेततळे बांधण्यात आले. तसेच २०१३-१४ मध्ये एकूण ४० शेततळे बांधण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत सन २०१२-१३ मध्ये मातीचे १५ व सिमेंट काँक्रीटचे १८ बंधारे असे एकूण २३ बंधारे बांधण्यात आले. सन २०१३-१४ मध्ये या कार्यालयामार्फत मातीचे एकूण ५४ बंधारे बांधण्यात आले तर सिमेंट काँक्रीटचे दोन बंधाऱ्यांचे काम पूर्ण करण्यात आले. दोन्ही वर्षांचे मिळून एकूण ७९ बंधाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेती सिंचनाखाली आणण्यात कृषी विभागाला यश मिळाले आहे. १९८० च्या वनकायद्याच्या अडथळ्यामुळे जिल्ह्यातील मोठे व लघू सिंचन प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. १९८० च्या वनकायद्यात शिथीलता आणून जिल्ह्यातील मोठे व लघू सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र याबाबत शासनाने अद्यापही निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक मोठे व लघूसिंचन प्रकल्प वनकायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. अशा परिस्थितीत कृषी विभागाच्यावतीने बांधण्यात आलेले शेततळे व सिमेंट काँक्रीट व मातीच्या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जि.पं.च्या कृषी विभागामार्फतही जिल्ह्यात शेततळे व बंधारे बांधण्यात आले आहेत. एका बंधाऱ्याच्या माध्यमातून एक हेक्टर शेती क्षेत्रात सिंचन सुविधा पुरविता येते. एका शेततळ्यापासून दोन एकर क्षेत्रापर्यंत सिंचन व्यवस्थेची सुविधा होते. जिल्ह्यातील आणखी बरेच शेती क्षेत्र सिंचनाखाली येणे बाकी आहे. उर्वरित क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी शेततळे व बंधारे निर्माण करावेत. (स्थानिक प्रतिनिधी)अनेक बंधाऱ्यांची दूरवस्थाप्रशासनाच्यावतीने काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात मातीचे तसेच सिमेंट काँक्रीटकरणाचे बंधारे बांधण्यात आले. मात्र या बंधाऱ्यांच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने जिल्ह्यातील अनेक बंधाऱ्यांची सध्या दूरवस्था झाली आहे. अनेक बंधारे फुटलेल्या अवस्थेत आहेत. अशा बंधाऱ्यांतून पावसाचे पाणी तत्काळ निघून जाते. तसेच जिल्ह्यातील काही बंधारे लिकेज आहेत. या बंधाऱ्यांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. मात्र या बंधाऱ्यांची दुरूस्ती करण्यात आली नाही. निकृष्ठ बांधकाम साहित्यामुळे काही बंधाऱ्यांची दूरवस्था झाली आहे.