४१७ पोलीस व २७५ होमगार्ड तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 23:30 IST2018-02-12T23:29:34+5:302018-02-12T23:30:12+5:30

श्रीश्रेत्र मार्र्कंडादेव येथे मंगळवारपासून सुरू होणाºया महाशिवरात्री यात्रेच्या बंदोबस्तासाठी ४१७ पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाच्या २७५ जवानांची तैनाती करण्यात आली आहे.

417 police and 275 Home guards posted | ४१७ पोलीस व २७५ होमगार्ड तैनात

४१७ पोलीस व २७५ होमगार्ड तैनात

ठळक मुद्देमार्कंडादेव यात्रा : जिल्हा प्रशासनाकडून बंदोबस्त

लोमेश बुरांडे।
आॅनलाईन लोकमत
चामोर्शी : श्रीश्रेत्र मार्र्कंडादेव येथे मंगळवारपासून सुरू होणाºया महाशिवरात्री यात्रेच्या बंदोबस्तासाठी ४१७ पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाच्या २७५ जवानांची तैनाती करण्यात आली आहे. यात्राकाळात अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हाप्रशासन व पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या नियंत्रणात व एसडीपीओ डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात बंदोबस्त लावण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाच्या वतीने ५ पोलीस निरीक्षक, ३८ पीएसआय, २८७ पुरूष पोलीस कर्मचारीा, ९२ महिला पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाचे २७५ जवान नेमण्यात आले आहेत. एकूणच पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
चामोर्शीचे ठाणेदार गोरख गायकवाड, एस. डी. मांडवकर, रमेश बासनवार, पीएसआय मल्हार थोरात, प्रीतम पुजारी, सुरेश घोडाम आदी विशेष प्रयत्न करीत आहेत.
१४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगरानी
मार्र्कंडादेव यात्रेत मुख्य पोलीस चौकी उभारण्यात आली असून परिसरात ९ चौक्या व ५० पोलीस पॉर्इंट ठेवण्यात आले आहे. तसेच दामिनी पथक, गुन्हे प्रतिबंधक पथक, बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक, वाहतूक शाखा, व्हीआयपी व्यवस्था, चार बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. सोबतच संपूर्ण यात्रेवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. अपंग, ज्येष्ठ नागरिक, वयोवद्ध, गर्भवती महिला, स्तनदा मातांसाठी दर्शन घेण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. हरविलेल्या व्यक्तींसाठी खोया-पाया कक्ष उभारण्यात आला आहे. चामोर्शी परिसरातील दारूविक्रेत्यांना हद्दपार करण्यात आले आहे, अशी माहिती एसडीपीओ डॉ. सागर कवडे यांनी दिली.

Web Title: 417 police and 275 Home guards posted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.