१४ केंद्रांवर चार हजार क्विंटल धानाची आवक

By Admin | Updated: November 17, 2016 02:05 IST2016-11-17T02:05:53+5:302016-11-17T02:05:53+5:30

आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत सन २०१६-१७ च्या खरीप हंगामासाठी

4 thousand quintals of arrivals at 14 centers | १४ केंद्रांवर चार हजार क्विंटल धानाची आवक

१४ केंद्रांवर चार हजार क्विंटल धानाची आवक

६८ लाख ६७ हजारांची खरेदी : आदिवासी विकास महामंडळामार्फत संस्थांचे २० केंद्र सुरू
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत सन २०१६-१७ च्या खरीप हंगामासाठी एकूण ५५ धान खरेदी मंजूर करण्यात आली असून आतापर्यंत २० केंद्र सुरू करण्यात आले आहे. यापैकी १४ केंद्रांवर धानाची आवक सुरू झाली असून आतापर्यंत या केंद्रांवर ६८ लाख ६७ हजार रूपये किमतीच्या ४ हजार ६७२ क्विंटल धानाची खरेदी झाली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत सहकारी संस्थांकडून दरवर्षी रब्बी व खरीप हंगामात कोट्यवधी रूपयांच्या धानाची खरेदी केली जाते. गतवर्षी सन २०१५-१६ च्या हंगामात गडचिरोली प्रादेशिक कार्यालयामार्फत सहकारी संस्थांचे एकूण ४२ केंद्र मंजूर करण्यात आले होते. मात्र यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने धानाचे उत्पादन भरघोस येणार या शक्यतेने महामंडळातर्फे अधिकाधिक धान केंद्रांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या यंदाच्या खरीप हंगामात धानाची आवक झालेल्या धान खरेदी केंद्रांमध्ये कुरखेडा तालुक्यातील कढोली, कोरची तालुक्यातील मर्केकसा, रामगड, पुराडा, मालेवाडा, ेयेंगलखेडा तसेच आरमोरी तालुक्यातील अंगारा, देलनवाडी, दवंडी, कुरंडी माल, पिंपळगाव, मौशीखांब या धान खरेदी केंद्राचा समावेश आहे. धानोरा तालुक्यातील धानोरा तसेच आदिवासी विकास महामंडळामार्फत सुरू झालेल्या घोट येथील केंद्राचा समावेश आहे. कढोली केंद्रावर १३९.८४ क्विंटल, मर्केकसा केंद्रावर ६८२ क्विंटल, रामगड केंद्रावर ३४० क्विंटल, येंगलखेडा ३४ क्विंटल, अंगारा केंद्रावर ३० क्विंटल, देलनवाडी केंद्रावर १५९९ क्विंटल, कुरंडी माल केंद्रावर २८८ क्विंटल, पिंपळगाव केंद्रावर १३४१ क्विंटल, मौशीखांब केंद्रावर ४ क्विंटल, धानोरा केंद्रावर ११४ क्विंटल, घोट केंद्रावर ७५८ क्विंटल धानाची खरेदी १५ नोव्हेंबरपर्यंत झाली आहे.
गतवर्षी सन २०१५-१६ च्या खरीप व रब्बी हंगामात आदिवासी विकास महामंडळांतर्गत सहकारी संस्थांच्या वतीने जवळपास ३५ कोटी रूपयांची धान खरेदी करण्यात आली. या धान खरेदी प्रक्रियेत संबंधित सर्व शेतकऱ्यांना धान चुकाऱ्याची रक्कम व बोनसची रक्कम अदा करण्यात आली आहे. मात्र सहकारी संस्थांचे कमिशन प्रलंबित आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: 4 thousand quintals of arrivals at 14 centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.