कारसह ४ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त
By Admin | Updated: May 15, 2017 01:35 IST2017-05-15T01:31:26+5:302017-05-15T01:35:17+5:30
देसाईगंज पोलिसांनी रविवारी बाहेर गावावरुन देसाईगंज येथे अवैधरित्या दारु आणून विक्री करण्याच्या

कारसह ४ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त
देसाईगंज पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : देसाईगंज पोलिसांनी रविवारी बाहेर गावावरुन देसाईगंज येथे अवैधरित्या दारु आणून विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील ४४ हजार रुपयांची दारू व इंडिका विस्टा कार जप्त केली.
दोन इसम कारने दारू आणत असल्याची माहिती मिळताच देसाईगंजचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वात सहायक फौजदार अरुण जुआरे, शिपाई जितेंद्र भोयर, बाबर आदींनी देसाईगंजच्या बाजारवाडीतील अवतार मेडिकलजवळ पाळत ठेवली. यावेळी एक पांढऱ्या रंगाची इंडिका विस्टा कार संशयास्पद स्थितीत येताना दिसली. ही कार थांबवून तिची तपासणी केली असता कारमध्ये २४ हजार रुपये किंमतीचे बिअरचे ८ बॉक्स व देशी दारूच्या पाच पेट्या आढळून आल्या. त्याची किमत २० हजार रुपये एवढी होते. पोलिसांनी ही ४४ हजार रुपयांची दारु व साडेचार लाख रुपये किमतीची कार असा एकूण ४ लाख ९४ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील दारू बंद झाल्याने भंडारा व गोंदिया जिल्ह्यातून दारू तस्करीचे प्रमाण वाढले आहे. देसाईगंज पोलिसांनी याच मार्गावर विशेष पाळत ठेवण्यास सुरूवात केली आहे.