कतलीसाठी जाणाऱ्या ३९ जनावरांची सुटका
By Admin | Updated: September 24, 2015 01:49 IST2015-09-24T01:49:36+5:302015-09-24T01:49:36+5:30
ट्रकमध्ये जनावर कोंबून कतलीसाठी नेण्याकरिता वाहतूक करणाऱ्या वाहनाला कुरखेडा पोलिसांनी पकडून ३९ जनावरांची सुटका केली.

कतलीसाठी जाणाऱ्या ३९ जनावरांची सुटका
कुरखेडा पोलिसांची कामगिरी : कोंडवाड्यात ठेवली जनावरे
कुरखेडा : ट्रकमध्ये जनावर कोंबून कतलीसाठी नेण्याकरिता वाहतूक करणाऱ्या वाहनाला कुरखेडा पोलिसांनी पकडून ३९ जनावरांची सुटका केली. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली. सदर कारवाई बुधवारी पहाटे ५ ते ६ वाजताच्या सुमारास गुरनोली फाट्याजवळ करण्यात आली आहे.
आरोपी नौशाद इब्राहीम अली सय्यद (२९) रा. लाखनी जिल्हा भंडारा व मौशीन नसीर पठाण (१९) रा. डिप्राटोला हे बुधवारी पहाटे एमएच-३६-१९४३ या वाहनामध्ये ३१ गोऱ्हे व ६ बैल भरून घेऊन जात होते. सदर जनावर कतलीसाठी नेण्यात येत असल्याचे पोलिसांना लक्षात आल्यावर त्यांनी गुरनोली फाट्याजवळ सदर वाहन थांबवून दोघांनाही अटक केली व त्यांच्यावर भादंविच्या ११ (१) (घ) (ड) अधिनियम १९६० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. जनावरांची रवानगी कुरखेडा येथील कोंडवाड्यात करण्यात आली आहे.
घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विजय वनकर करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी अहेरी येथेही जनावरे पकडले होते. (तालुका प्रतिनिधी)