३८ कोटी ६२ लाखांची थकबाकी
By Admin | Updated: November 16, 2014 22:49 IST2014-11-16T22:49:16+5:302014-11-16T22:49:16+5:30
जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक, कृषी पंपधारक, पाणीपुरवठा योजना, ग्रामपंचायत, सार्वजनिक सेवा व तात्पुरती स्वरूपाची जोडणी (कनेक्शन) घेणाऱ्या एकूण १ लाख १३ हजार ३९४ ग्राहकांवर

३८ कोटी ६२ लाखांची थकबाकी
विद्युत देयके : १ लाख १३ हजार ३९३ ग्राहकांकडे
दिलीप दहेलकर - गडचिरोली
जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक, कृषी पंपधारक, पाणीपुरवठा योजना, ग्रामपंचायत, सार्वजनिक सेवा व तात्पुरती स्वरूपाची जोडणी (कनेक्शन) घेणाऱ्या एकूण १ लाख १३ हजार ३९४ ग्राहकांवर ३८ कोटी ६२ लाख ३० हजार ७४० रूपयांची विद्युत बिलाची थकबाकी आहे. सर्वाधिक थकबाकी कृषी पंपधारक व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिवाबत्तीसाठी तसेच नळ पाणीपुरवठा योजनेसाठी घेतलेल्या ग्राहकांवर आहे.
थकबाकीदार ग्राहकांची संख्या विचारात घेतल्यास सर्वाधिक ग्राहक घरगुती कनेक्शनधारक आहेत. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगर परिषद अंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा करणाऱ्या विभागाच्या ग्राहकांवर मोठ्या प्रमाणात विद्युत बिल थकीत आहे. दवाखाने, पोलीस ठाणे, डाक विभाग अशा सार्वजनिक सेवा असलेल्या तसेच तात्पुरत्या स्वरूपाचे कनेक्शन घेतलेल्या ग्राहकांवरही विद्युत देयके थकीत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात महावितरणचे गडचिरोली व आलापल्ली हे दोन विभाग आहेत. गडचिरोली विभागांतर्गत आरमोरी, धानोरा, गडचिरोली, कोरची व कुरखेडा आदी सहा उपविभाग आहेत. तर आलापल्ली विभागात भामरागड, आलापल्ली, चामोर्शी, एटापल्ली, मुलचेरा व सिरोंचा या सहा उपविभागाचा समावेश आहे. आलापल्ली विभागातील ५० हजार २२ वीज कनेक्शन घेतलेल्या सर्व प्रकारच्या ग्राहकांवर १७ कोटी ४६ लाख ६५ हजार ३११ रूपयांची विद्युत देयकापोटी थकबाकी आहे. तर गडचिरोली विभागातील ६३ हजार ३७२ सर्व प्रकारच्या ग्राहकांवर २१ कोटी १५ लाख ६५ हजार ४२९ रूपयांची विद्युत बिलाची थकबाकी आहे.
आलापल्ली विभागात एकूण १९ हजार ९३४ घरगुती वीज कनेक्शनधारकांकडे १४ कोटी ४४ लाख १ हजार ५९० रूपयांची थकबाकी आहे. १ हजार १६७ व्यावसायीक वीजधारकांकडे ३९ लाख ५ हजार ६३० रूपयांची थकबाकी आहे. १७९ औद्योगिक वीज कनेक्शनधारकांकडे ९ लाख ४७ हजार ८४० रूपयांची थकबाकी आहे. सार्वजनिक सेवेमधील ४९३ वीज ग्राहकांवर २२ लाख २७ हजार ७९९ रूपयांची विद्युत बिलाची थकबाकी आहे. यामुळे महावितरणपुढे अडचण निर्माण झाली आहे.