देसाईगंज तालुक्यात ३६ हजार ४९० मतदार बजावणार हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:31 IST2021-01-15T04:31:05+5:302021-01-15T04:31:05+5:30
देसाईगंज : पहिल्या टप्प्यात तालुक्यात १७ ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारीला निवडणूक हाेणार आहे. या निवडणुकीत ३६ हजार ४९० मतदार मतदानाचा ...

देसाईगंज तालुक्यात ३६ हजार ४९० मतदार बजावणार हक्क
देसाईगंज : पहिल्या टप्प्यात तालुक्यात १७ ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारीला निवडणूक हाेणार आहे. या निवडणुकीत ३६ हजार ४९० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
देसाईगंज तालुक्यात एकूण १७ ग्रामपंचायतींच्या एकूण ५९ प्रभागातील सार्वत्रिक निवडणूक हाेणार आहे. यासाठी १६१ सदस्य निवडून द्यायचे आहेत. यापैकी २६ उमेदवार अविरोध निवडून आले आहेत. असे असले तरी उर्वरित १३५ जागांसाठी तब्बल ३१४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण मतदारांमध्ये १८ हजार ३७६ पुरुष तर १८ हजार ११४ महिलांचा समावेश आहे. तालुक्यात कुरूड, कोंढाळा, शिवराजपूर, किन्हाळा, मोहटोला, डोंगरगाव(ह.), विहीरगाव, पोटगाव, शंकरपूर, कसारी, पिंपळगाव(ह.), चोप, बोळधा, एकलपूर, विसोरा, तुळशी, कोकडी आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यापैकी आमगाव, कोंढाळा, विसोरा, चोप, कोकडी आदी गावात राजकीय वातावरण तापले आहे.