३६ लाखांची रोहयो मजुरी प्रदान

By Admin | Updated: December 20, 2014 01:34 IST2014-12-20T01:34:48+5:302014-12-20T01:34:48+5:30

३१ जुलै २०१४ च्या शासन निर्णयानुसार गडचिरोली जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांना विलंब झाल्यास अतिरिक्त मजुरी देण्याबाबत अंमलबजावणी सुरू झाली आहे.

36 lakh rupees in cash | ३६ लाखांची रोहयो मजुरी प्रदान

३६ लाखांची रोहयो मजुरी प्रदान

गडचिरोली : ३१ जुलै २०१४ च्या शासन निर्णयानुसार गडचिरोली जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांना विलंब झाल्यास अतिरिक्त मजुरी देण्याबाबत अंमलबजावणी सुरू झाली आहे. आतापर्यंत प्रशासनाने जिल्हाभरात ३६ लाख १० हजार ९२७ रूपये अतिरिक्त मजुरी प्रदान केली आहे.
शासनाने ३१ जुलै २०१४ रोजी रोहयो मजुराच मजुरी अदा करण्यास विलंब झाल्यास संबंधीत मजुरांना ०.०५ प्रती दिवस दराने व्याजासह मजुरीच रक्कम अदा करण्याचा निर्णय घेतला होता. या शासन निर्णयाची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यात सुरू झाली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने बाराही तालुक्यातील रोहयो मजुरांना व्याजासह अतिरिक्त मजुरी अदा करण्यात आली आहे. अहेरी तालुक्यातील मजुरांना ३२ हजार ७७२ रूपये, आरमोरी तालुक्यातील मजुरांना सर्वाधिक ९ लाख ६१ हजार २२६, भामरागड तालुक्यातील १ लाख ८४ हजार २७, चामोर्शी तालुक्यातील मजुरांना ४ लाख ५१ हजार ६३५, देसाईगंज तालुक्यातील मजुरांना ८१ हजार ३१, धानोरा तालुक्यातील मजुरांना ४ लाख ९१ हजार १०७, एटापल्ली तालुक्याला १ लाख २० हजार ४६१, गडचिरोली तालुक्यात ३ लाख ८४ हजार, कोरची तालुक्यात ४५ हजार ४२८, कुरखेडा तालुक्याला ६ लाख १२ हजार, मुलचेरा १ लाख ७८ हजार, सिरोंचात ६७ हजार रूपयाची अतिरिक्त मजुरी अदा करण्यात आली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: 36 lakh rupees in cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.