३५४ बसफेऱ्या सुरू, प्रवाशांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:29 IST2021-01-04T04:29:56+5:302021-01-04T04:29:56+5:30
गडचिराेली : काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी मार्चपासून राज्य परिवहन महामंडळाची वाहतूक बंद हाेती. आता काेराेनाचा प्रादुर्भाव कमी हाेत असून ...

३५४ बसफेऱ्या सुरू, प्रवाशांना दिलासा
गडचिराेली : काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी मार्चपासून राज्य परिवहन महामंडळाची वाहतूक बंद हाेती. आता काेराेनाचा प्रादुर्भाव कमी हाेत असून प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लालपरीचा प्रवास आता पूर्वपदावर येत आहे. गडचिराेली आगारातील ९८ बसफेऱ्याच्या माध्यमातून ३५४ बसफेऱ्या नियमितपणे सुरू आहेत. त्यामुळे काेराेनाच्या काळात ताेट्यात गेलेल्या महामंडळाला आता आर्थिक उत्पन्न बऱ्यापैकी मिळत आहे.
काेराेना महामारीमुळे मार्च ते ऑगस्ट या कालावधीत सहा महिने महामंडळाची बससेवा पूर्णपणे बंद हाेती. त्यानंतर शासनाने अनलाॅकचा निर्णय घेतल्याने २० ऑगस्ट २०२० राेजी ५० टक्के प्रवासी क्षमतेसह बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. आता काेराेना रूग्णसंख्या घटल्याने एसटी महामंडळाची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. सध्या गडचिराेली आगारात १९१ चालक व १७७ वाहक कार्यरत असून ३५४ नियमित बसफेऱ्या सुरू आहेत.
नववी ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले असून महामंडळाच्या बसमधून विद्यार्थी शाळेच्या गावी प्रवास करीत आहेत. त्यामुळे आगाराच्यावतीने संबंधित विद्यार्थ्यांना पासेस देण्याचे काम सुरू असून हे काम अंतिम टप्प्यात पाेहाेचले आहे.