शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
6
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
7
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
8
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
9
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
10
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
11
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
12
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
13
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
14
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
15
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
16
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
17
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
18
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

गडचिरोलीच्या जंगलातील ३५ क्विंटल मोहसडवा नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 8:08 PM

दारू गाळण्यासाठी टाकलेला तब्बल ३५ क्विंटल मोहसडवा गडचिरोली तालुक्यातील मुरूमबोडी आणि बोथेडा येथील जंगल शिवारातून पोलिसांनी आणि मुक्तिपथ तालुका चमूने नष्ट केला. चार ठिकाणी जवळपास ४५ ड्रममध्ये हा सडवा टाकण्यात आला होता.

ठळक मुद्दे४५ ड्रममध्ये होता भरूनमुक्तिपथ आणि पोलिसांची संयुक्त कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दारू गाळण्यासाठी टाकलेला तब्बल ३५ क्विंटल मोहसडवा गडचिरोली तालुक्यातील मुरूमबोडी आणि बोथेडा येथील जंगल शिवारातून पोलिसांनी आणि मुक्तिपथ तालुका चमूने नष्ट केला. चार ठिकाणी जवळपास ४५ ड्रममध्ये हा सडवा टाकण्यात आला होता. दारूभट्ट्या आणि गाळण्यासाठी लागणारे साहित्यही पोलिसांनी नष्ट केले. २ लाखांचा हा मुद्देमाल असल्याचे सांगण्यात आले.मुरूमबोडी आणि बोथेडा या दोन्ही गावांमध्ये दारूविक्र ी मोठ्या प्रमाणात होते. बहुतेक घरी दारू गाळली जाते. आसपासच्या अमिर्झा, आंबेशिवनी गिलगाव, खुर्सा यासह २० गावांमध्ये ही दारू पोहोचवली जाते. तसेच जवळच्या गावातील लोकही येथे मोठ्या प्रमाणात दारू पिण्यासाठी येतात.जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात मोहाचा सडवा टाकल्याची माहिती मुक्तिपथ तालुका चमुला मिळाली होती. त्यांनी गडचिरोली पोलिसांना माहिती दिली. बुधवारी सकाळी ६ वाजतापासून पोलीस आणि मुक्तिपथ चमूने सर्वप्रथम बोथेडा गावाला लागून असलेला तलाव परिसर पिंजून काढला असता मोहसडवा भरून असलेले सहा ड्राम सापडले. हा सडवा तलावात टाकून नष्ट करण्यात आला. यानंतर मुरूमबोडी जंगल परिसरात तीन ठिकाणी ३९ ड्रम सडवा सापडला. चार ठिकाणी दारूभट्ट्या लावण्यात आल्या होत्या. अ‍ॅल्युमिनियमचे २२ हंडे पोलिसांना सापडले. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला.ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक डी.डी.उदार यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार बी.एस. ठाकरे, पोलीस हवालदार खरकाडे, डांगे, खोब्रागडे, रामटेके यांच्या चमूने केली. मुक्तिपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर आणि उपसंघटक रेवनाथ मेश्राम या कारवाईत सहभागी झाले होते.देसाईगंजमध्ये ११ लिटर दारू जप्तदेसाईगंज शहरातील डॉ.आंबेडकर वॉर्ड येथील मुक्तिपथ संघटनेने ११ लिटर मोहाची दारू पकडली. एका इसमाकडे सडवा असून दारूच्या कॅन असल्याची माहिती वॉर्ड संघटनेला बुधवारी सकाळी मिळाली. त्यांनी या घराची तपासणी केली असता एक ड्रम मोहसडवा आणि ११ लिटर दारू सापडली. महिलांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी सडवा नष्ट करून दारू जप्त केली. आणखी एका महिलेकडे सडवा असल्याचे संघटनेला सायंकाळी निदर्शनास आले. त्यांनी या महिलेकडील एक ड्रम सडवा नष्ट केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी