३५ पेट्या विदेशी दारू पकडली
By Admin | Updated: February 11, 2017 01:52 IST2017-02-11T01:52:47+5:302017-02-11T01:52:47+5:30
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली

३५ पेट्या विदेशी दारू पकडली
आष्टी : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निवडणुकीच्या अनुषंगाने विक्री करण्यासाठी साठवून ठेवलेल्या विदेशी दारूच्या ३५ पेट्या शुक्रवारी चामोर्शी तालुक्याच्या मुधोली गावातून जप्त केल्या.
जि.प., पं.स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारूचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होऊ शकतो. या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेने कंबर कसली असून गेल्या सात-आठ दिवसांपासून अवैध दारू विक्रेत्यांविरोधात धाडसत्र सुरू केले आहे. मुधोली येथे धाड टाकून पोलिसांनी २ लाख १० हजार रूपये किमतीची ३५ पेट्या विदेशी दारू जप्त केली. दारू पुरवठादार अमित गोपत्तीवार व विपुल चक्रवर्ती तसेच एका महिलेवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस उपनिरिक्षक सुनिल इंगळे, पोलीस हवालदार जुमनाके, पोलीस नाईक वाळके, नरोटे, चव्हारे, दुर्गा साखरे, मुंडे आदींनी केली. (प्रतिनिधी)