चामोर्शीतील ३४१ कुटुंबांना घरकुलांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 05:00 AM2020-07-12T05:00:00+5:302020-07-12T05:00:45+5:30

ग्रामपंचायतीच्या काळात प्रभाग क्रमांक ६ व ८ मधील कुटुंबांना घरकूल मंजूर करण्यात आले. नगर पंचायत अस्तित्वात आल्यानंतर आखिव पत्रिकेची शासकीय अटीनुसार घरकुलासाठी आखीव पत्रिका आवश्यक आहे. मात्र चामोर्शी शहराचा सीटी सर्वे न झाल्याने सदर ३४१ कुटुंबांना घरकुलापासून वंचित राहावे लागत आहे. प्लाटची आखिव पत्रिका मिळण्यासाठी झोपडीत वास्तव्य करणाऱ्या या कुटुंबांना प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागत आहे.

341 families in Chamorshi waiting for houses | चामोर्शीतील ३४१ कुटुंबांना घरकुलांची प्रतीक्षा

चामोर्शीतील ३४१ कुटुंबांना घरकुलांची प्रतीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देपट्टे व आखिव पत्रिका केव्हा मिळणार?; आबादी जागेवरील प्लॉटधारकांचा संघर्ष कायमच

रत्नाकर बोमीडवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : ४० वर्षापूर्वी चामोर्शी शहरातील ३४१ कुटुंबांना प्रशासनाने आबादी जागेवर प्लाट दिले. परंतु आखीव पत्रिका व पट्टे न मिळाल्याने सदर गरीब कुटुंब घरकूल योजनेपासून वंचित आहेत.
चामोर्शी शहरातील सर्वे नंबर १०९९, ११००, १००१, ११०४/१, आराजी ४.८६ हेक्टर आर पैकी काही शासकीय जागेवर प्रशासनाने ४० वर्षापूर्वी प्रभाग क्रमांक ६, ८ व १५ मधील १४१ व याच सर्वे नंबर मधील बाजाराच्या जागेवर वास्तव्य असलेल्या २०० कुटुंबाना हटवून प्रभाग क्रमांक १५ मध्ये प्लाट दिले. प्लाट मिळालेल्या या ३४१ कुटुंबांना घरटॅक्स पावती व नमुना ८ देण्यात आला आहे. तत्कालीन ग्रामपंचायतीच्या काळात प्रभाग क्रमांक ६ व ८ मधील कुटुंबांना घरकूल मंजूर करण्यात आले. नगर पंचायत अस्तित्वात आल्यानंतर आखिव पत्रिकेची शासकीय अटीनुसार घरकुलासाठी आखीव पत्रिका आवश्यक आहे. मात्र चामोर्शी शहराचा सीटी सर्वे न झाल्याने सदर ३४१ कुटुंबांना घरकुलापासून वंचित राहावे लागत आहे. प्लाटची आखिव पत्रिका मिळण्यासाठी झोपडीत वास्तव्य करणाऱ्या या कुटुंबांना प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागत आहे.
आखिव पत्रिका, सातबारा व जमिनीचा पट्टा न मिळाल्याने ३४१ कुटुंबांना घरकुलाअभावी झोपडीत राहावे लागत आहे. सदर कुटुंबांना पट्टे मिळावे, या मागणीचे निवेदन स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष माणिकचंद कोहळे व इतरांनी २५ जुलै २०१९ व ६ जानेवारी २०२० जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हा व तालुका भूमिअभिलेख, नगर पंचायतीला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी भूमिअभिलेख कार्यालय, तहसीलदार यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले. मात्र कार्यवाही करण्यासाठी विलंब होत आहे. गडचिरोली वगळता इतर जिल्ह्यात आखीव पत्रिका देणे सुरू आहे. याबाबत लोकप्रतिनिधी, नगर पंचायत प्रशासन व तालुका प्रशासनाने ठोस पावले उचलून त्या कुटुंबांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.

घरकुलासाठी लागणारे दस्तावेज ज्यांच्याजवळ आहे, अशा कुटुंबांचे प्रस्स्ताव स्वीकारल्या जात आहे. ज्यांच्याजवळ कागदपत्र नाही त्यांना संधी देत असून भूमिअभिलेख कार्यालयाशी सिटी सर्वे मोजणीबाबत चर्चा सुरू आहे.
- सतिश चौधरी, मुख्याधिकारी,
नगर पंचायत चामोर्शी

आवास योजनेसाठी आवश्यक दस्तावेज
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी अर्जासोबत विविध दस्तावेज आवश्यक आहेत. यामध्ये आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, नमुना ८-अ, आखीव पत्रिका, रजिस्ट्री, ७/१२, जमिनीचा पट्टा, बँक पासबूक, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला (तहसीलदारांचा), कुटुंबातील सर्व व्यक्तींचे आधार कार्ड, मागील तीन वर्षाची घर टॅक्स पावती आदींचा समावेश आहे. सदर दस्तावेज असलेल्यांना घरकूल मंजूर केले जाते.

Web Title: 341 families in Chamorshi waiting for houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.