३२ नवीन बाधित तर १८ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:33 IST2021-03-22T04:33:28+5:302021-03-22T04:33:28+5:30

एकूण बाधितांची संख्या १० हजार १४१ एवढी झाली आहे. त्यापैकी ९ हजार ७१६ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या ...

32 newly infected and 18 corona free | ३२ नवीन बाधित तर १८ कोरोनामुक्त

३२ नवीन बाधित तर १८ कोरोनामुक्त

एकूण बाधितांची संख्या १० हजार १४१ एवढी झाली आहे. त्यापैकी ९ हजार ७१६ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या ३१७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत एकुण १०८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.८१ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ३.१३ टक्के तर मृत्यू दर १.०६ टक्के झाला. नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील रामपुरी वार्ड धानोरा रोड १, जेप्रा १, शाहू नगर १,बालाजी नगर १, वनश्री कॉलनी १, आयटीआय चौक पंचवटी नगर १, धानोरा रोड युनियन बँकेजवळ १, अडपल्ली गोगाव १, शिवाजी हायस्कुल पोर्ला ३, आशिर्वाद नगर चामोर्शी रोड १, साईनगर १, रामपुरी वार्ड कॅम्प एरिया १,आरटीओ कार्यालयाजवळ १, अहेरी तालुक्यातील आलापल्ली १, कन्नेपल्ली १, नागेपल्ली ३, स्थानिक १, आरमोरी तालुक्यातील स्थानिक २, वैरागड ४, एटापल्ली तालुक्यातील कसनसुर १, स्थानिक २, सिरोंचा तालुक्यातील स्थानिक १, वडसा तालुक्यातील कन्नमवार वार्ड १ जणाचा समावेश आहे.

Web Title: 32 newly infected and 18 corona free