ट्रक उलटून ३२ तेंदू मजूर जखमी

By Admin | Updated: May 14, 2017 01:42 IST2017-05-14T01:42:01+5:302017-05-14T01:42:01+5:30

तेंदू बोद भराईच्या कामासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील ८४ मजूरांना अहेरी तालुक्यातील मन्नेराजारामकडे घेऊन जाणारा ट्रक

32 injured laborers injured in truck accident | ट्रक उलटून ३२ तेंदू मजूर जखमी

ट्रक उलटून ३२ तेंदू मजूर जखमी

तीन गंभीर : पेरमिलीनजीकची घटना; तेंदू बोद भराईच्या कामाला जात होते
लोकमत न्यूज नेटवर्क
पेरमिली/आलापल्ली : तेंदू बोद भराईच्या कामासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील ८४ मजूरांना अहेरी तालुक्यातील मन्नेराजारामकडे घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने ३२ मजूर जखमी झाल्याची घटना पेरमिली पासून तीन किमी अंतरावर शनिवारी सकाळी ६ ते ७ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातातील तीन मजूर गंभीर जखमी झाले आहेत.
गंभीर जखमीमध्ये अशोक तुकाराम उंदीरवाडे (४५), बाळकृष्ण मारोती परसोळे (४०) व रामचंद्र भोयर (३५) सर्व रा. अंतरगाव (गायडोंगरी) यांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात सध्या तेंदू संकलनाच्या हंगामाला वेग आला असून या कामासाठी कंत्राटदार मजूरांना वाहनाने कामाच्या ठिकाणी आणत आहेत. कंत्राटदार गौसुदीन यांनी मन्नेराजाराम ग्रामपचांयतीचा तेंदू युनिट खरेदी केला आहे. शनिवारी चंद्रपूर जिल्ह्यातील अंतरगाव व गायडोंगरी या दोन गावातील ८४ मजुरांचा समावेश असलेल्या १२ चमू ट्रकने तेंदू बोद भराईच्या कामासाठी आणले जात होते. गडचिरोली मार्गे आलापल्ली-मन्नेराजारामकडे येत असताना सकाळी ६ ते ७ वाजताच्या दरम्यान मजूर घेऊन येणारा ट्रक पेरमिलीपासून तीन किमी अंतरावर उलटला. या ट्रकमध्ये एकूण ८४ मजूर होते. यापैकी ३२ जण जखमी झाले. त्यामधील तीन मजूर गंभीर जखमी असून इतर मजूर किरकोळ जखमी आहेत. मजूर घेऊन येणारा सदर ट्रक अंतरगाव येथून शनिवारी रात्री १ वाजताच्या सुमारास मन्नेराजारामसाठी रवाना झाला, अशी माहिती जखमी मजुरांनी दिली. गंभीर तीन मजुरांना चंद्रपूरच्या रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या घटनेचा तपास पेरमिलीचे ठाणेदार अशोक निमगिरे व पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.

 

Web Title: 32 injured laborers injured in truck accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.