कत्तलीसाठी नेणारी ३२ जनावरे पकडली

By Admin | Updated: October 5, 2015 01:42 IST2015-10-05T01:42:44+5:302015-10-05T01:42:44+5:30

छत्तीसगड राज्यात कत्तलीसाठी चार वाहनांमधून नेण्यात येणारी ३२ जनावरे चामोर्शी पोलिसांनी पकडल्याची घटना गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील नवेगाव रै. ...

32 animals taken for slaughter | कत्तलीसाठी नेणारी ३२ जनावरे पकडली

कत्तलीसाठी नेणारी ३२ जनावरे पकडली

चार वाहने जप्त : चौघांना अटक ; चामोर्शी पोलिसांची कारवाई
तळोधी मो. : छत्तीसगड राज्यात कत्तलीसाठी चार वाहनांमधून नेण्यात येणारी ३२ जनावरे चामोर्शी पोलिसांनी पकडल्याची घटना गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील नवेगाव रै. येथे रविवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी चार वाहनांना जप्त करून चार आरोपींना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये चांद तासावार चाऊस रा. (२१) मूर्तिजापूर, इरशाद कुरेशी रफी रा. दिंदोरी जारवा, शहबाज अहमद रफीक अरमान रा. मूर्तिजापूर व अन्य एका आरोपीचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , गुप्त माहितीच्या आधारे चामोर्शी पोलिसांनी चामोर्शी मार्गावर नवेगाव रै. परिसरात गस्त घातली. दरम्यान तळोधी मो. परिसरातून या मार्गाने एमएच ३७ जे ९५६, एमएच ३० एबी २३६१, एमएच २७ एक्स ७५१७ व एमएच ३३-४७८१ क्रमांकाची चार वाहने येताना दिसली. पोलिसांनी सदर वाहने अडवून तपासणी केली असता, या चारही वाहनात जनावरे कोंबून आणत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी सदर चारही वाहने तळोधी मो. ग्रामपंचायतीच्या परिसरात नेले. त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या समक्ष या जनावरांचा पंचनामा करून ३२ जनावरांना तेथील कोंडवाड्यात टाकले. यामध्ये १४ गायी व १८ बैलांचा समावेश आहे. चांद तासावार, इरशाद कुरेशी, रफी व शहबाज अहमद रफीक अरमान या तिन्ही वाहनचालकांना वाहनासह ताब्यात घेऊन चामोर्शी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. चामोर्शी पोलिसांनी यातील चारही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खंडारे, पोलीस उपनिरिक्षक माने, बिट जमादार राजेश गुटके, मरस्कोल्हे, वडेट्टीवार, भांडेकर आदींनी केली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे कत्तल होणाऱ्या ३२ जनावरांना जीवदान मिळाले. (वार्ताहर)

Web Title: 32 animals taken for slaughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.