दुचाकीसह ३१ हजाराची दारू जप्त
By Admin | Updated: July 31, 2016 02:07 IST2016-07-31T02:07:55+5:302016-07-31T02:07:55+5:30
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे देसाईगंजचे पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह ....

दुचाकीसह ३१ हजाराची दारू जप्त
देसाईगंज पोलिसांची कारवाई : ब्रह्मपुरीच्या दारू विक्रेत्यास अटक
देसाईगंज : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे देसाईगंजचे पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह शनिवारी देसाईगंज-ब्रह्मपुरी मार्गावर पाळत ठेवून विर्शी टी पार्इंटजवळ एका दारू विक्रेत्या आरोपींकडून दुचाकींसह ३१ हजार रूपयांची दारू जप्त केली.
या प्रकरणी दारू विक्रेता दुचाकी वाहनचालक विनोद देवराव ठाकरे (३६) रा. पेटवार्ड क्रमांक ६ ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर याला अटक करण्यात आली असून त्याचेवर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देसाईगंज-ब्रह्मपुरी मार्गाने दुचाकीवरून दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील यांना मिळाली. त्यांनी या मार्गावरील विर्शी टी पार्इंटजवळ सापळा रचून एमएच ३४ डब्ल्यू ९८३० क्रमांकाचे वाहन थांबविले. या वाहनातील एका बॅगमधून सहा हजार रूपये किमतीची देशी दारूच्या १५० निपा जप्त केल्या व २५ हजार रूपये किमतीची दुचाकी ताब्यात घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.(वार्ताहर)