३१ जणांनी केले रक्तदान
By Admin | Updated: October 3, 2014 01:35 IST2014-10-03T01:35:01+5:302014-10-03T01:35:01+5:30
तालुक्यातील राजगाटा चक व पोर्ला येथे रक्तदान शिबिराचे आयोजन मंगळवारी करण्यात आले.

३१ जणांनी केले रक्तदान
गडचिरोली : तालुक्यातील राजगाटा चक व पोर्ला येथे रक्तदान शिबिराचे आयोजन मंगळवारी करण्यात आले. या रक्तदान शिबिरात ३१ जणांनी रक्तदान केले. राजगाटा येथे ६४ युवक युवतींची एचआयव्ही टेस्ट करण्यात आली.
नवचैतन्य बहुउद्देशीय सेवा संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात ११ जणांनी रक्तदान केले. यावेळी ६४ युवक, युवतींची एचआयव्ही टेस्ट करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद भोयर, नितेश दाकोटे, रुपचंद मेश्राम, सुनिल चुधरी, निलिमा बालपांडे, सविता वैद्य, प्रिया खोब्रागडे, विजय पतीलवार, जीवन गेडाम, बंडू कुमरे, मुख्याध्यापिका उसेंडी आदी उपस्थित होते.
पोर्ला येथे संमिश्र शारदा उत्सव मंडळ व प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी २० जणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन डॉ कमलाकर राडे यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराच्या अध्यक्षस्थानी पोर्लाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. करेवार होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. कापसे, पोलीस पाटील हितेंद्र बारसागडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रामटेके आदी उपस्थित होते. रक्तदानाचे फायदे, रक्तदानाविषयी असलेला गैरसमज याविषयी डॉ. कापसे यांनी मार्गदर्शन केले. तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करावे, असे आवाहन डॉ. करेवार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन पवन किरणापुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, रक्त संक्रमण तंत्रज्ञ कर्मचारी व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)