३१९१ ‘श्रीं’ची स्थापना होणार

By Admin | Updated: September 4, 2016 01:48 IST2016-09-04T01:48:38+5:302016-09-04T01:48:38+5:30

महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणराया आहे. संपूर्ण जिल्हावासीयांना प्रतीक्षा लागलेल्या गणेशोत्सवाला पाच सप्टेंबर सोमवारपासून सुरूवात होत आहे.

31 9 1 'Shree' will be established | ३१९१ ‘श्रीं’ची स्थापना होणार

३१९१ ‘श्रीं’ची स्थापना होणार

उद्यापासून गणेशोत्सवाला प्रारंभ : शांतता व सुरक्षेसाठी तगडा पोलीस बंदोबस्त
गडचिरोली : महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणराया आहे. संपूर्ण जिल्हावासीयांना प्रतीक्षा लागलेल्या गणेशोत्सवाला पाच सप्टेंबर सोमवारपासून सुरूवात होत आहे. जिल्हाभरात यावर्षी ४९३ सार्वजनिक, २ हजार ५०६ खासगी व एक गाव एक गणपतीची संकल्पना १९२ गावात राबविण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण ३ हजार १९१ गणेश मूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे.
भामरागड पोलीस उपविभागांतर्गत पाच सार्वजनिक व १९ खासगी गणरायांच्या मूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे. गडचिरोली पोलीस उपविभागांतर्गत गडचिरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९८ सार्वजनिक, एक हजार खासगी, आरमोरी पोलीस ठाण्यांतर्गत ६० सार्वजनिक तर १४५ खासगी, पोटेगाव पोलीस मदत केंद्रांतर्गत पाच सार्वजनिक व ३४ खासगी, घोट पोलीस मदत केंद्रांतर्गत पाच सार्वजनिक, १४० खासगी अशा एकूण २०८ सार्वजनिक व १ हजार ८३९ खासगी गणेश मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. धानोरा पोलीस उपविभागांतर्गत येरकड, चातगाव, मुरूमगाव व धानोरा पोलीस ठाण्याचा समावेश असलेल्या गावांमध्ये सार्वजनिक आठ व ५३ खासगी गणपती मूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे. अहेरी पोलीस उपविभागांतर्गत अहेरी, आष्टी, मुलचेरा, पेरमिली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये ६७ सार्वजनिक व २६० खासगी गणेश मूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे. जिमलगट्टा पोलीस उपविभागांतर्गत देचलीपेठा, मरपल्ली, रेपनपल्ली व जिमलगट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये खासगी ४० व सार्वजनिक १२ गणेशमूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे. सिरोंचा पोलीस उपविभागांतर्गत आसरअल्ली, बामणी, रेगुंठा, सिरोंचा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये ३० सार्वजनिक व खासगी ३३ गणेशमूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे. पेंढरी कॅम्प कारवाफा विभागांतर्गत जारावंडी, गोडलवाही, गट्टा (फूलबोडी) व पेंढरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये खासगी ११ व पाच सार्वजनिक गणेशमूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे. कुरखेडा कॅम्प देसाईगंज पोलीस उपविभागांतर्गत कोटगूल, मालेवाडा, बेडगाव, कोरची, पुराडा व कुरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये सार्वजनिक १४१ व खासगी १३२ गणेशमूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे. एटापल्ली पोलीस उपविभागांतर्गत जारावंडी व एटापल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये सार्वजनिक १७ व खासगी १३० गणेशमूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पोलीस अधिकाऱ्यांची या उत्सवावर नजर राहणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

१९२ गावांत एक गाव एक गणपती
गावात एकात्मता राहून गावात शांततेने गणेशोत्सव साजरा व्हावा, या उद्देशाने एक गाव एक गणपतीची संकल्पना दरवर्षी जिल्ह्यात राबविली जाते. यंदा जिल्ह्यात एकूण १९२ गावात एक गाव एक गणपतीची संकल्पना राबविण्यात येणार आहे. यामध्ये गडचिरोली पोलीस उपविभागांतर्गत ५८, धानोरा पोलीस उपविभागांतर्गत २५, अहेरी उपविभागांतर्गत २३, जिमलगट्टा उपविभागांतर्गत चार, सिरोंचा उपविभागांतर्गत २८, कारवाफा उपविभागांतर्गत ११, देसाईगंज उपविभागांतर्गत ३९ व एटापल्ली उपविभागांतर्गत ४ गावांचा समावेश आहे.

राज्य शासनाने यावर्षीपासून सर्व जिल्ह्यात लोकमान्य उत्सवातील महत्त्वाच्या विषयावर सार्वजनिक गणेश मंडळांना स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये स्वदेशी, साक्षरता, व्यसनमुक्ती, बेटी बचाओ, जलसंवर्धन आदी विषयांवर देखावे व उत्कृष्ट सजावट करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय विविध सार्वजनिक गणेश मंडळ अनेक स्पर्धांचे आपल्या स्तरावर आयोजन करून अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविणार आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला विद्युतीकरण व रोषणाईकरिता तात्पुरती वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Web Title: 31 9 1 'Shree' will be established

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.